‘द केरला स्टोरी’ चित्रपट आज (५ मे) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाच्या कथेवरून प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. आता चित्रपटाच्या ट्रेलरवर यूट्यूबने आक्षेप घेत कारवाई केली आहे.

हेही वाचा- अनुष्का शर्मा ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये करणार पदार्पण; फ्रान्सच्या राजदूतांनी शेअर केले फोटो

यूट्यूबने अनेक दिवसांपूर्वी ही कारवाई केली होती. पण आता एका यूजरने यूट्यूबवरून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ट्वीट केले आहे. युजरने ट्वीट केले की ‘द केरला स्टोरी’चा ट्रेलर सर्च केल्यावर यूट्यूबवरून एक इशाराचिन्ह दिसतो. ज्यावर लिहिले आहे की हा कंटेंट आत्महत्या आणि आत्महानीशी संबंधित आहे.

यूट्यूबच्या या कारवाईनंतर चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा चांगलीच भडकली आहे. अदाने ‘सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल’, असे कॅप्शन देत री-ट्वीट केले आहे.

हेही वाचा- ‘पोन्नियिन सेल्वन: २’च्या कमाईत सलग तिसऱ्या दिवशी घट; जाणून घ्या सातव्या दिवसातील चित्रपटाची कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाबाबत नेमका वाद काय आहे?

दरम्यान, केरळमध्ये लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर निर्मात्यांनी ३२ हजार मुलींची संख्या काढून ३ केली आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम् या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.