बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष सर्वार्थाने खास ठरलं होतं. कारण, तब्बल ४ वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खान ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर परतला होता. यानंतर शाहरुखने दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटलीच्या ‘जवान’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर हजार कोटींहून अधिक गल्ला जमावण्यात यश मिळालं होतं. त्यामुळे यंदाच्या वर्षीच्या सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंग खानचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.

शाहरुख खानने त्याच्या संपूर्ण टीमसह नुकत्याच पार पडलेल्या ‘झी सिने अवॉर्ड’ सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी त्याच्या ‘जवान’ चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कारांवर नाव कोरलं. शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारावर अ‍ॅटलीने नाव कोरलं.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर करण्यासाठी रंगमंचावर राणी मुखर्जी आली होती. राणीने विजेत्याचं नाव जाहीर करताच अ‍ॅटलीच्या चेहऱ्यावर एकच आनंद पसरला. दिग्दर्शक भर कार्यक्रमात लगेच किंग खानच्या पाया पडला, त्याने शाहरुखला मिठी मारली, अभिवादन केलं आणि त्यानंतर अ‍ॅटली पुरस्कार स्वीकारण्यासाठी रंगमंचावर गेला.

हेही वाचा : ‘नाच गं घुमा’नंतर स्वप्नील जोशीने केली नव्या चित्रपटाची घोषणा! नाव आहे खूपच खास, जाणून घ्या…

पुरस्कार जाहीर होताच अ‍ॅटली शाहरुखच्या पाया पडत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सर्वत्र दिग्दर्शकाच्या साधेपणाचं कौतुक करण्यात येत आहे. ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख व त्याची सहकारी पूजाने प्रत्येक गोष्टीत मदत केल्याचं अ‍ॅटलीने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. त्यामुळेच पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी आदरार्थी भावनेने अ‍ॅटली शाहरुखच्या पडला.

हेही वाचा : लोकप्रिय युट्यूबर अभि आहे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेक, तर नियू आहे सून; दोघांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सन्मान

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानव मंगलानी या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, ‘जवान’ चित्रपटामध्ये शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, गिरीजा ओक, रिद्धी डोगरा, दीपिका पदुकोण, प्रियमणी, सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.