छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या शोचा आता तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोच शूटिंग ७ ऑगस्टपासून सुरू करण्यात आले असून आता प्रेक्षक आतुरतेने वाट बघताना दिसत आहेत. या शोमधे कपिल शर्मा, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, किकू शरद आणि अर्चना पुरनसिंह अशी जुनी टीम प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. या बरोबरच यात त्यांचा जुना मित्रं कॉमेडीयन सुदेश लहरी पण सामील होणार आहे. ‘द कपिल शर्मा शोने काही दिवसांपूर्वी एक प्रोमो रिलीज केला होता ज्यात त्यांचे लसीकरण झाले असल्याचे सांगत सुदेश लहरी याचे स्वागत केले होते. हे तर ऑन स्क्रीन झालं. मात्र ऑफ स्क्रीन कृष्णा अभिषेकने एका अनोख्या अंदाजात सुदेश लहरीच स्वागत करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांची जोडी पुन्हा एकदा शोमधे दिसणार म्हणून कृष्णाला आनंद झाला असून त्याच स्वागत करताना दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.
कृष्णा अभिषेकने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत सुदेशचं कौतुक करताना दिसत आहे. यात तो चाहत्यांना सांगताना दिसला की, “सुदेशने उत्कृष्ट काम केलं आहे, आज याचा पहिला दिवस होता आणि त्याने या एपिसोडमधे कमाल केली आहे. हा भाग जेव्हा ऑन एअर जाईल तेव्हा तुम्ही स्वतः अनुभवाल, सुदेश तुझ्या फॅमिलीपेक्षा जास्त आनंदी आज मी झालो आहे.” कृष्णाच्या या कमेंटवर उत्तर देत सुदेश बोलला, “याला म्हणतात खरा मित्र, खरं प्रेम, मित्र असावा तर असा, तुझ्या सारखा तूच.” यावर पुन्हा मस्करी करतं कृष्णा बोलला, “असं काही नाही…ते उधारीवर एक कोटी त्याला दिले आहेत ना ते परत मिळतील याचा कॉन्फिडंन्स आला आहे.” सुदेश आणि कृष्णाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओ खाली त्याने कॅप्शन देत लिहिले की, “#TKSS चा पहिला दिवस, माझ्या मित्रासोबतची उत्तम सुरवात.”
View this post on Instagram
‘द कपिल शर्मा’ शोच्या स्पेशल जज अर्चना पूरन सिंह यांनी पण एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमधे त्या शोच शूटिंग सुरू झाल्याचे सांगताना दिसत आहेत, तसंच जरी जुनी लोकं असली तरी नवीन जोश असल्याचे त्यांनी या व्हिडओत सांगितले आहे. या व्हिडीओखाली त्यांनी कॅप्शन देत लिहिले, “नवीन सुरवात..पहिला दिवस, पहिलं शूट, नवीन सिझन. या नवीन सुरवातीसाठी खूप उत्सुक आहे. आम्ही सगळे तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहोत.”
View this post on Instagram
दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच दरम्यान अभिनेता अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सिझनमध्ये पहिला पाहुणा हा अभिनेता अक्षय कुमार दिसून येणार आहे. त्यामुळे आता शोचे चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.