विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेचा विषय ठरत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.

अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. चंद्रमुखी हा चित्रपट अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. या चित्रपटाने मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अवघ्या दोन दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. फक्त दोन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटाची कमाई समोर आली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे. तसेच जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसत आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर पाहायला मिळत आहे. आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यांद्वारे सर्वांचीच मने जिंकली आहे. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.