कलर्सवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ सध्या बऱ्याच चर्चेत आहे. हा एक स्टंट बेस रिअ‍ॅलीटी शो असून यात टीव्ही क्षेत्रातील नामवंत कलाकार कठीण स्टंटस् परफॉर्म करताना दिसतील. हा शो लवकरच आपल्या भेटीला येणार असून या शोचं चित्रीकरण अफ्रिकेतील ‘केपटाऊन’ या शहरात झाले आहे. या शोचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी करताना दिसेल.

गेले काही दिवस ‘खतरों के खिलाडी  ११’ हा शो सतत चर्चेत आहे. अनुष्का सेनचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येणे असो किंवा वरूण सुदची दुखापत, अशी बरीच संकटे या शोवर आली. पण तरीही हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शो मध्ये अनुष्का सेन, राहुल वैद्य, वरुण सुद, विशाल आदित्य सिंग, सना मकबुल बरोबर सौरभ राज जैन,आस्था गिल, महक चहल, दिव्यांका त्रिपाठी देखील स्टंट करताना दिसतील. टेलीचक्करने दिलेल्या माहितीनुसार खतरों के खिलाडीला त्यांचे ‘टॉप ३ फायनलिस्ट’ मिळाले आहेत.

राहुल वैद्य, विशाल आदित्य सिंग, वरुण सुद हे ‘खतरों के खिलाडी’च्या महाअंतिम फेरीत पोहचले आहेत. म्हणजे या तिघांमध्ये महाअंतिम स्पर्धा रंगणार आहे. याच बरोबर दिव्यांका त्रिपाठी आणि अर्जुन बिजलानी पण उपांत्यफेरीत पोहोचले आहेत असे सांगितले जात आहे. नुकताच कलर्स वाहिनीने नवीन प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये विशाल एकापेक्षा एक कठीण स्टंटस् करताना दिसत आहे.

दरम्यान खतरों के खिलाडीचे शुटिंग संपल्याची घोषणा सोशल मीडियावर सूत्रसांचालक रोहित शेट्टीने केली होती. रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत केपटाऊन येथील ‘खतरों के खिलाडी’चे शूटिंग संपल्याचे सांगितले. त्याने या पोस्ट खाली ४२ दिवसांच्या भावना ही व्यक्त केल्या आहेत. आणि शेवटी “सायनिंग ऑफ केपटाऊन बॅक टू मुंबई” असे कॅप्शन दिले. ‘खतरों के खिलाडी’ लवकरच आपल्या भेटीला येत आहे’ असे ही त्यानी त्या पोस्ट मध्ये सांगितले.