scorecardresearch

Premium

बिग बींचा आवाज ऐकल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना आली होती शुद्ध? अमिताभ म्हणतात, “डोळे उघडले अन्…”

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका प्रसंगाबाबत सांगितलं आहे.

Raju Srivastava death Raju Srivastava funeral
राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका प्रसंगाबाबत सांगितलं आहे.

सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं बुधवारी (२१ सप्टेंबर) सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच अवघ्या मनोरंजन विश्वासालाच दुःखद धक्का बसला. काल (२२ सप्टेंबर) राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कलाविश्वातील काही मंडळी यावेळी उपस्थित होती. तर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्याबाबत खास ब्लॉग लिहिला आहे.

“लहानपणापासून अमिताभ बच्चन माझे आदर्श आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा अमिताभ यांची नक्कल करूनच मी माझं पोट भरलं आहे.” असं राजू श्रीवास्तव यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आता अमिताभ आपल्या या लाडक्या कलाकाराबाबत भरभरून बोलले आहेत.

actor jitendra talks about marathi people
“मराठी लोकांमध्ये हावरटपणा नव्हता”, जितेंद्र यांनी केलं कौतुक; म्हणाले, “तेव्हा लबाड…”
Trupti Devrukhkar Sharmila Thackeray 2
“मला त्यांच्याकडून मराठीत माफी हवी होती, माझी…”; तृप्ती देवरुखकरांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Tanuja Birth Day Special
अभिनेत्री तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या कानशिलात का लगावली होती? नेमकं काय घडलं होतं तेव्हा?
Vivek agnihotri reply naseeruddin shah
“त्यांचं दहशतवाद्यांवर प्रेम…” नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ टीकेनंतर विवेक अग्निहोत्रींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या धर्मामुळे…”

काय म्हणाले अमिताभ बच्चन?
“आणखी एक सहकारी, मित्र व सर्जनशील कलाकार आम्हाला सोडून गेला. अचानक एका आजाराने त्याला गाठलं आणि त्याचं अकाली निधन झालं. त्याची विनोदबुद्धी आणि जन्मतः त्याच्याकडे असलेली कला नेहमीच आपल्याबरोबर राहील. स्पष्ट, नेहमीच हसत राहणारा परिपूर्ण असा हा कलाकार होता. आता स्वर्गातही तो हसत असेल. तसेच देवालाही हसवत राहील.” असं अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – कुटुंबीय, चाहत्यांची गर्दी जमली पण…; राजू श्रीवास्तव यांचा भाऊ अंत्यसंस्काराला पोहोचलाच नाही, यामागचं कारण काय?

पुढे म्हणाले, “तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून तुम्ही व्हॉईस नोट आम्हाला पाठवा असं त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून मला सांगण्यात आलं. मी तेदेखील केलं. त्याला माझा आवाज ऐकवण्यात आला. माझा आवाज ऐकल्यानंतर काही वेळासाठी त्याने डोळे उघडले. पण नंतर डोळे त्याने बंद केले.” खरं तर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान राजू श्रीवास्तव यांना बिग बींचा आवाज ऐकवला जात होता. याबाबत आता त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Comedian raju srivastava death superstar amitabh bachchan says he listen my voice and open eyes see details kmd

First published on: 23-09-2022 at 12:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×