Coolie Box Office Collection Day 11: लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ १४ ऑगस्ट रोजी सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रदर्शित झाला. ‘वॉर २’ बरोबर टक्कर असूनही, या चित्रपटाने त्याच्या ओपनिंग वीकेंडमध्ये प्रचंड कमाई केली आणि अनेक विक्रमही केले.

पहिल्या आठवड्यात चित्रपटाने २२९.६५ कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या दिलेल्या माहितीनुसार, ‘कुली’ने रिलीजच्या ११ व्या दिवशी १०.७५ कोटी रुपये कलेक्शन केले आहेत. यासह, ११ दिवसांत ‘कुली’चे एकूण कलेक्शन आता २५६.७५ कोटी रुपये झाले आहे.

लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात नागार्जुन, श्रुती हासन, उपेंद्र, सौबिन शाहीर आणि सत्यराज यांच्याही भूमिका आहेत, तर आमिर खान एका छोट्या भूमिकेत आहे.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

19:09 (IST) 25 Aug 2025

"ती काळी आहे, तिला कास्ट करू नको", रंगामुळे नाकारलेलं काम; मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' कटू अनुभव

Marathi Actress On Color Discrimination : सावळ्या रंगामुळे मिळालेलं रिजेक्शन, लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला स्वत:चा अनुभव; म्हणाली, "आपल्या देशात..." ...सविस्तर बातमी
18:09 (IST) 25 Aug 2025

अमिताभ बच्चन नाही तर 'या' अभिनेत्यावर जया बच्चन यांना होता 'क्रश'; म्हणालेल्या, "जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिले…"

जया बच्चन यांना प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यावर होता ‘क्रश’; म्हणालेल्या... ...सविस्तर वाचा
17:12 (IST) 25 Aug 2025

या आठवड्यात OTT वर रिलीज होणार धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज, वाचा यादी…

OTT Release this Week : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहता येणार? घ्या जाणून… ...अधिक वाचा
16:24 (IST) 25 Aug 2025

'यह रिश्ता क्या कहलाता है' फेम अशनूर कौरने 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यापूर्वी हिना खान कडून घेतलेला सल्ला, ऑन्सक्रीन आईबद्दल म्हणाली...

Bigg Boss 19 Contestant Ashnoor Kaur Took Tips From Hina Khan : 'बिग बॉस'मध्ये जाण्यापूर्वी अशनूर कौरने ऑनस्क्रीन आई हिना खानकडून घेतलेला सल्ला, म्हणाली... ...वाचा सविस्तर
16:03 (IST) 25 Aug 2025

…म्हणून शिल्पा शेट्टी यंदा साजरा करणार नाही गणेशोत्सव; कारण सांगत म्हणाली, "आमच्या घरात…"

शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा होणार नाही गणपती बाप्पाचं आगमन; अभिनेत्रीने सांगितले कारण, म्हणाली… ...वाचा सविस्तर
15:55 (IST) 25 Aug 2025

'केजीएफ' आणि 'कांतारा' फेम ज्येष्ठ अभिनेते दिनेश मंगळुरू यांचं निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dinesh Mangaluru Passed Away : ज्येष्ठ कन्नड अभिनेते आणि कला दिग्दर्शक दिनेश मंगळुरू यांचे निधन, सिनेविश्वावर शोककळा ...अधिक वाचा
15:17 (IST) 25 Aug 2025

मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झालेली सुंदरी 'बिग बॉस १९'मध्ये; कोण आहे नेहल चुडासमा?

Bigg Boss 19 Nehal Chudasama : 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी झालेली नेहल चुडासमा कोण आहे? जाणून घ्या ...सविस्तर बातमी
15:05 (IST) 25 Aug 2025

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटावर अभिनेत्याच्या मॅनेजरचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "एक-दोन आठवड्यात..."

गेल्या आठवड्यात गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. सुनीता यांनी मुंबईतील एका फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र, अभिनेत्याच्या मॅनेजरनं आता या चर्चेत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. तसंच हे सगळं काही महिन्यांपूर्वी घडलेलं हे देखील मॅनेजरनं स्पष्ट केलं.

गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून होत आहेत. या पार्श्वभूमीवर गोविंदाच्या मॅनेजरनं या अफवांचं खंडन केलं आहे. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी पीटीआयला सांगितलं की, या चर्चा जुन्याच आहेत, सहा-सात महिन्यांपूर्वी हे सगळं घडलं होतं. सुनीता यांनी सहा-सात महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, आता सर्व काही ठीक होत आहे. एक-दोन आठवड्यात सगळ्यांना बातमी मिळेल. असं गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितलं आहे.

15:04 (IST) 25 Aug 2025

Bigg Boss 19 मध्ये सहभागी झालेला बसीर अली कोण आहे? याआधीही गाजवलेत अनेक रिअ‍ॅलिटी शो; यंदाच्या पर्वात काय खास?

Bigg Boss 19 Basir Ali :'रोडीज' आणि 'स्प्लिट्सव्हिला'चा विजेता आता 'बिग बॉस'च्या घरात; बसीर अलीच्या एंट्रीनं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ...अधिक वाचा
15:04 (IST) 25 Aug 2025

'तू म्हणशील तसं' नाटकाने घेतला प्रेक्षकांचा निरोप, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाला…

Sankarshan Karhade Post : ४५० प्रयोगांनंतर संकर्षण कऱ्हाडेच्या नाटकाने घेतला प्रेक्षकांचा निरोप, भावुक होत म्हणाला, "हे माझं पहिलं बाळ..." ...वाचा सविस्तर
13:24 (IST) 25 Aug 2025

"मी काय बोलू? बाबा तर…", गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर मुलगी टीनाने दिली प्रतिक्रिया; म्हणाली…

लग्नाच्या 38 वर्षानंतर गोविंदा-सुनीता घटस्फोट घेणार का? मुलगी टीना म्हणाली, "माझे बाबा…" ...अधिक वाचा
12:28 (IST) 25 Aug 2025

लग्नाच्या दोन वर्षांनंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा होणार आई-बाबा; पोस्ट शेअर करीत म्हणाली…

Parineeti Chopra Pregnancy : परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांच्या घरी लवकरच होणार चिमुकल्या पाहुण्याचे आगमन ...वाचा सविस्तर
11:40 (IST) 25 Aug 2025

"सगळे एकमेकांबद्दल गॉसिप करतात...", मिथुन चक्रवर्तींनी सांगितलं बॉलीवूडमधील पार्ट्या व पुरस्कार सोहळ्यांना न जाण्यामागचं कारण; म्हणाले...

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींंनी एका वर्षात केलेलं १९ चित्रपटांत काम, म्हणाले... ...वाचा सविस्तर
11:35 (IST) 25 Aug 2025

Video : "Reels म्हणजे अभिनय नाही", हास्यजत्रेच्या मंचावर प्रसाद ओकचं स्पष्ट मत; म्हणाला, "खूप मोठा भ्रम…"

"रील व्हिडीओ करून आपण स्टार होऊ...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला? वाचा... ...सविस्तर बातमी
11:35 (IST) 25 Aug 2025

Video : "Reels म्हणजे अभिनय नाही", हास्यजत्रेच्या मंचावर प्रसाद ओकचं स्पष्ट मत; म्हणाला, "खूप मोठा भ्रम…"

"रील व्हिडीओ करून आपण स्टार होऊ...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला? वाचा... ...सविस्तर बातमी
11:18 (IST) 25 Aug 2025

'कभी खुशी कभी गम'फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला मुलीला जन्म

Malvika Raaj Welcomes Baby Girl : लग्नानंतर दीड वर्षांनी आई झाली बॉलीवूड अभिनेत्री; फोटो शेअर करत म्हणाली... ...वाचा सविस्तर
11:09 (IST) 25 Aug 2025
'महाराष्ट्रीयन भाऊ' स्टेजवर आला अन् सलमान खानही मराठी बोलला; व्हिडीओ होतोय व्हयरल

प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन 'महाराष्ट्रीयन भाऊ' प्रणित मोरेनं 'बिग बॉस 19'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसच्या घरातला अकरावा सदस्य म्हणून प्रणित मोरेनं प्रवेश केला. लाडक्या 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला 'बिग बॉस 19'च्या मंचावर पाहून चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. प्रणित मोरे अगदी शांतपणे चालत 'बिग बॉस 19'च्या मंचावर आला. मराठमोळा प्रणित स्टेजवर येताच सलमान खान घडाघडा मराठीत बोलू लागला. त्यानंतर दोघांमधील संभाषणानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/DNvrlVWZPt-/

11:02 (IST) 25 Aug 2025

'देवमाणूस'मधील गंगाच्या एक्झिटचा सीन 'असा' झालेला शूट, किरण गायकवाड व एकता डांगरने केलेली पूर्वतयारी; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

Devmanus Fame Ekta Dangar Shared A Video : सलग ३ रात्र सुरू होतं 'देवमाणूस'मधील मर्डर सीनचं शूटिंग, नेटकरी म्हणाले... ...सविस्तर वाचा

Coolie

'वॉर २' बरोबर टक्कर असूनही, 'कुली' चित्रपटाने त्याच्या ओपनिंग वीकेंडमध्ये प्रचंड कमाई केली आणि अनेक विक्रमही केले. 'कुली'मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत.