२१ दिवसांचा लॉकडाउन तुम्हाला खूप मोठा वाटतोय का? मात्र आम्ही या २१ दिवसात घरी असतो तर काय केलं असतं तुम्हाला पहायचंय का?, असं म्हणत मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात ‘ऑन ड्युटी’ असणाऱ्या पोलिसांनी २१ दिवसात काय केलं असतं यासंदर्भातील आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार फिदा झाले आहेत. अनेकांनी ट्विट करुन मुंबई पोलिसच खरे सुपर हिरो असल्याचं सांगत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे या व्हिडिओमध्ये?

या व्हिडिओमध्ये काही महिला पोलीसांबरोबर पोलीस अधिकारीही ‘मी २१ दिवस घरी असतो तर काय केलं असतं?’ या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहेत. ‘आम्ही घरातून बाहेरच येणार नाही’ असं मास्क लावलेली व्हिडिओतील पहिलीच महिला पोलीस हवालदार सांगताना दिसते. “पोलिसांना कुटुंबाला वेळ देत येत नाही. त्यामुळे अशी संधी मिळालीच तर आम्ही नक्कीच कुटुंबाला वेळ देऊ,” असं त्या सांगतात. तर एक पोलीस अधिकाऱ्याने “मला अशी संधी मिळाली असती तर मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवला असता,” अशी इच्छा व्यक्त केली. “जर मी घरी असते तर मी घरच्यांसोबत म्हणजेच माझी आईबरोबर, बहिणींबरोबर वेळ घालवला असता. पुस्तकं वाचली असती. चित्रपट पाहिले असते,” असं एक महिला पोलीस हसत हसत सांगताना दिसते. “घरी असतो तर मी पुस्तकं वाचली असती, मुलांबरोबर खेळतो असतो,” असं मास्क लावलेला एक पोलीस हवालदार व्हिडिओमध्ये सांगताना दिसतो. तर एक महिला पोलीस अधिकारी विवाहित असल्याने मी नवऱ्याला वेळ दिला असता असं सांगते. “माझं लग्न झालं आहे. मात्र मला माझ्या नवऱ्याला वेळ देता येत नाही. आता इथे २४ तास ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे २१ दिवस मिळाले असते तर मी माझ्या नवऱ्याला वेळ दिला असता. घरात वेळ घालवला असता,” असं ही महिला सांगते. दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने “मला सुट्टी असती तर मी माझ्या पत्नीबरोबर, घरातील पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवला असता. खूप झोपा काढल्या असत्या”, असं सांगितलं. “मी घरच्यांबरोबर वेळ घालवला असता, जेवण बनवलं असतं, झोपले असते, चित्रपट पाहिले असते, मस्त वेळ एन्जॉय केला असता,” असं महिला हसत हसत सांगताना दिसत आहे.

या व्हिडिओच्या ट्विटला रिट्विट करत अनेक कलाकारांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. आम्ही सदैव तुमच्या ऋणात राहू, तुमच्याबद्दलचा आदर शब्दात व्यक्त करता येणार नाही, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया कलाकारांनी नोंदवल्या आहेत. कोण काय म्हणालं आहे पाहुयात…

व्हिडिओ शेअर करणाऱ्या अजय देवगणला मुंबई पोलिसांचा रिप्लाय

यावर अजय म्हणाला, तुम्ही फक्त आवाज द्या हा सिंघम…

मराठमोळी सई ताम्हणकर म्हणाली मुंबई पोलीस जगात भारी

पोलीस म्हणतात भारी तर आहोतच पण…

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रस्क्विन्हा म्हणतो, आपण किती गोष्टी गृहित धरतो

मुंबई पोलिसांचे उत्तर, “आम्हाला आवडणाऱ्या शहराची सेवा करायला मिळतेय हाच आमचा सन्मान”

सुनील शेट्टी म्हणाला हेच खरे हिरो. त्यावर मुंबई पोलीस म्हणतात…

सदैव तुमच्या ऋणात राहू असं अभिषेक बच्चन म्हणाला

मुंबई पोलिसांचा अभिषेक बच्चनला भन्नाट रिप्लाय, “होय सगळं नॉर्मल होईल फक्त मुंबईकरांनी दस बहाणे करता कामा नये”

आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धन्यवाद असं रिचा चढ्ढा म्हणाली

तुमचे धन्यवाद करावे तितके कमीच आहेत असं अजूर्न कपूर म्हणतोय….

अर्जूनला मुंबई पोलिस म्हणतात शहरावर प्रेम करणारे हजारो इश्कजादे आहेत.

“तुमच्या बद्दलचं प्रेम आणि आदर आम्ही शब्दात मांडू शकत नाही,” असं आलिया भट्टने म्हटलं आहे.

आलियाला मुंबई पोलिसांचे उत्तर…

रविना तंडन म्हणते मुंबई पोलिसांना धन्यवाद म्हणण्याची हीच ती वेळ

आपल्या स्वप्नांसाठी स्वत:ची स्वप्न पणाला लावणारे मुंबई पोलीस असं शाहीद कपूरने मुंबई पोलिसांचं वर्णन केलं आहे.

शाहीदच्या ट्विटवर पोलीस म्हणतात, “सर्वात शानदार पाठिंबा दाखवायचं असेल तर…”

क्रिकेटपटू धवल कुलकर्णी म्हणतो, “आम्ही तुम्हाला खूप काही देणं लागतो”

आम्ही नशिबवान आहोत की तुम्ही आहात, असं टायगर श्रॉफ म्हणतोय.

तर बॉलिवूडचे भिडू आणि टायगरचे वडील जॅकी श्रॉफ म्हणतात, “मुंबई पोलीसच खरे स्टार”

आयुष्मान खुरानाचे मराठीत ट्विट…

आणि पोलिसांनीही मानले आयुष्मानचे आभार…


भारी व्हिडिओ आहे नक्की पाहा असं चेतन भगत म्हणतोय

शेवटचं आवाहन अत्यंत महत्वाचं

व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या शेवटी पोलिसांनी एक आवाहन केलं आहे. “खूप साध्या इच्छा आहेत नाही यांच्या. मात्र मुंबई सारख्या स्वप्न नगरीची कोणतीही स्वप्न अपूर्ण राहू नयेत म्हणून त्यांना या इच्छा पूर्ण करता येत नाही. तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करता यावी म्हणून ते बाहेर आहेत. त्यामुळेच त्यांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करणार नाही का? त्यांची सर्वात मोठी इच्छा हीच आहे की मुंबई आणि मुंबईकरांनी करोना आणि त्यासारख्या इतर सर्व धोक्यांपासून सुरक्षित रहावं. कराल ना त्यांना मदत?” असा सवाल पोलिसांनी मुंबईकरांना विचारला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus bollywood celebrities thanks and praise mumbai police for their tireless efforts during lockdown scsg
First published on: 09-04-2020 at 15:18 IST