दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाई यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एका लहान मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती आलियाचे गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलीने आलिया भट्टप्रमाणे गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील लूक केला आहे. या लूकमध्ये ती आलियाचे डायलॉग बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या क्यूट व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा : ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर पाहून मेहश भट्ट म्हणाले…
आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील ही छोटी मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मुलीचे नाव हारिती असे आहे. ती व्हिडीओमध्ये आलिया भट्ट प्रमाणे अभिनय करताना दिसत आहे. या छोट्या गंगूबाईचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.