बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणजे राखी सावंत. राखी वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेला स्पायडर मॅनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. ‘बिग बॉस’च्या १४व्या सिझनमध्ये राखीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. उद्या रक्षाबंधन आहे. अशात तिला रक्षाबंधनला बिग बॉसचा होस्ट अभिनेता सलमान खानला राखी बांधायची इच्छा व्यक्त केली आहे. तिने याचे कारण एका मुलाखतीत सांगितले आहे.
राखीने ‘पिंकविल्ला’ला दिलेल्या मुलाखतीत तिची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळेस तिने सांगितले की, “मला सलमानला राखी बांधायची आहे, कारण त्याने माझ्या आईला नवीन जीवन दिलं. मला त्याच्यासाठी खास त्याचा फोटो असलेली राखी हवी आहे. कोणी बनवू शकेल का?” याच बरोबर तिला ‘बिग बॉस १४’चा स्पर्धक विकास गुप्ताला पण राखी बांधायची आहे, असे तिने त्या मुलाखतीत सांगितले आहे.
View this post on Instagram
दरम्यान राखीने तिच्या इनस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ती बिग बॉसवर नाराज असल्याचे तिने त्या व्हिडीओत सांगितले आहे. कारण तिला बिग बॉसच्या ओटीटी व्हर्जनसाठी बोलावले नाही. ती त्या व्हिडीओत म्हणते की, “बिग बॉस मी खूप नाराज आहे. कारण तुम्ही मला बोलावलं नाही. तुम्ही SidNaaz ला (सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल) बोलावलं मात्र मला का नाही बोलावलं, बिग बॉस मी येते आहे…करण जोहर सगळ्यांचा क्लास घेत आहे. मात्र सर्वांची डोकी गरम झाली असून तुम्हाला माझी गरज आहे.” तिला बिग बॉसच्या घरात जाऊन सर्वांना शांत करायचे आहे आणि तिच्या कॉमेडीचा तडका लावायचा आहे. तिने या व्हिडीओमध्ये सांगितले की, ” बिग बॉस मला माहिती आहे की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुम्ही वचन दिलं होतं की तुम्ही दरवर्षी मला बिग बॉससाठी आमंत्रण देणार मग काय झाले? मला काही माहीत नाही मी बिग बॉस ओटीटीमध्ये येतं आहे.” राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस १५’ ओटीटी हा लोकप्रिय शो ठरला आहे. या शोचे सूत्रसंचालन करण जोहर करत असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा शो तुम्हाला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.