दिशा पटानी (Disha Patani), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि जॉन अब्राहम (John Abraham) सध्या ‘एक विलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटामध्ये दिशा-जॉनचे बोल्ड सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पण चित्रपटामध्ये इंटिमेट सीन करताना दिशाला नेमका काय अनुभव आला? हे नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये तिने सांगितलं.

आणखी वाचा – Video : “न्यूड फोटोशूटसाठी पुरस्कार मिळाला का?” रणवीर सिंगचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दिशा-जॉनने एका प्रमोशनल कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी इंटिमेट सीन चित्रीत करणं एक मुलगी म्हणून कितपत कठीण असतं? असा प्रश्न दिशाला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत तिने जॉनचं यावेळी भरभरुन कौतुक केलं. तिला चित्रपटामधील इंटिमेट सीन चित्रीत करण्यासाठी चित्रपटाच्या टीमचीही उत्तम साथ मिळाली.

पाहा व्हिडीओ

दिशा म्हणाली, “मी हा सीन जॉन अब्राहमबरोबर केला आहे. त्याच्याबरोबर इंटिमेट सीन करणं माझ्यासाठी फार कठीण नव्हतं. जॉन आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांनी सीन चित्रीत करत असताना मला योग्य वाटत आहे की नाही याची खूप काळजी घेतली. खरं सांगायचं झालं तर मला याबाबत कोणतीच तक्रार नाही.”

आणखी वाचा – Video : पुणे विमानतळावर ‘पावनखिंड’ चित्रपट सुरु होता अन्…; प्रत्यक्ष बाजीप्रभु देशपांडेंचं घडलं दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एक विलन रिटर्न्स’ हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शन प्रेक्षकांना या चित्रपटाच्यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. दिशा, अर्जुन, तारा, जॉन पहिल्यांदाच या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. येत्या २९ जुलैला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.