टीव्ही कलाकार एकता कौल ही नुकतीच ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी डान्स शोमधून बाहेर पडली आहे. तीने पाच आठवडे या शोमध्ये घालवले. २५वर्षीय एकता डान्सच्या सरावावेळी हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुःखी होती. सुरुवातीला एकताला तिच्या नृत्यासाठी माधुरी, रेमो डिसोजा आणि करण जोहर या तिनही परीक्षकांच्या टीका सहन कराव्या लागल्या होत्या. पण तुषार कालिया याच्या मार्गदर्शनाअंतर्गत तिच्या नृत्यात सुधारणा येत गेल्या. तिच्या एका नृत्यासाठी परीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रीयाही मिळाल्या होत्या. एकता आता तिच्या कामाला बाजूला ठेवून जम्मूला आईवडिलांना भेटण्यास जाणार आहे. तसेच, त्यानंतर ती नृत्याकडेही लक्ष देणार आहे. एकता सध्या ‘झी’ वाहिनीवरील ‘रब से सोना इश्क’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2013 रोजी प्रकाशित
‘झलक दिखला जा ६’ मधून एकता कौल बाहेर
टीव्ही कलाकार एकता कौल ही नुकतीच 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी डान्स शोमधून बाहेर पडली आहे. तीने पाच आठवडे या शोमध्ये घालवले. २५वर्षीय एकता डान्सच्या सरावावेळी हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुःखी होती.

First published on: 30-06-2013 at 12:13 IST
TOPICSकरण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixitहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kaul exits jhalak dikhhla jaa