‘धाकड’ चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. पण कंगना तिच्या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसते. कंगनाची मेहनत रुपेरी पडद्यावर स्पष्टपणे दिसून येते. कंगनाचा आता बहुचर्चित ‘इमरजंसी’ (Emergency) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या टीझरमध्ये कंगनाचा लूक पाहून सारेच जण थक्क झाले आहेत.

आणखी वाचा – कतरिना कैफ आहे कुठे?, गरोदरपणाच्या चर्चांना उधाण, ‘या’ दिवशी देणार गुड न्यूज

‘इमरजंसी’ या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये इंदिरा गांधी यांच्या भूमिकेमधील कंगना पाहायला मिळत आहे. तिचं वागणं, बोलणं, लूक खरंच इंदिरा गांधी यांची आठवण करुन देणारा आहे. जवळपास १ मिनिटाचा हा टीझर पाहता चित्रपटाची भव्यदिव्यता लक्षात येते. कंगनाने इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली असल्याचं या टीझरमधूनच स्पष्टपणे दिसून येतं.

पाहा टीझर

या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डी.सी. १९७१ असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या लूकमधील कंगना महत्त्वाच्या फाईलची पडताळणी करताना दिसते. तिचा या टीझरमधील संवाद विशेष लक्षवेधी आहे. कंगनाने हा टीझर शेअर करताना म्हटलं की, ‘Presenting ‘Her’who was called ‘Sir’. तासाभरामध्येच दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा टीझर पाहिला आहे.

आणखी वाचा – कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न, घटस्फोट, नैराश्य अन्…; नात्याच्या दि एण्डनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमेंटच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी कंगनाच्या या भूमिकेचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. कंगनानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारीही कंगनानेच पेलली आहे. आणीबाणीच्या काळातील परिस्थिती या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न कंगनाने केला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.