आपल्या बाळाला जराशी ठेच लागली तरीही चेहऱ्यावर अस्वस्थ भाव येणारी आई सर्वांनाच ठाऊक आहे. पण, ‘त्याला किंवा तिला औषध लाव’, ‘अतिउत्साहीपणा काही कमी होणार नाही…’ असं जरा वरच्याच आवाजात सांगणाऱ्या बाबांकडे मात्र बऱ्याचदा आपण वेगळ्याच नजरेतून पाहतो. पण, मुलांची जबाबदारी काय असते हे अनेकदा त्या बाबांकडे पाहूनच लक्षात येतं. असेच काही सेलिब्रिटीसुद्धा सध्या पालकत्त्वाचा अनुभव घेत आहेत. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत आपल्या मुलांनाही शक्य तितका वेळ देत आहेत, त्यांचं बालपण अनुभवत आहेत. अशाच काही सेलिब्रिटी बाबांवर आपण नजर टाकणार आहोत. हे सेलिब्रिटी बाबा यंदा पहिल्यांदाच ‘फादर्स डे’ साजरा करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया हे सेलिब्रिटी आहेत तरी कोण….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहिद कपूर- अभिनेता शाहिद कपूर यंदा पहिल्यांदाच ‘फादर्स डे’ साजरा करणार आहे. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा सध्या त्यांच्या मुलीच्या म्हणजे मिशाच्या संगोपनावर लक्ष देत आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असूनही शाहिद नेहमीच मिशासोबत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देतो.

अरुण गवळी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या डॅडी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

 

करण जोहर- सेलिब्रिटी डॅड्समध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचं. सरोगसीच्या माध्यमातून करणने दोन जुळ्या मुलांचं पालकत्त्व स्वीकारलं आहे. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत.

आयुष शर्मा- सलमान खानची बहिण अर्पिता खान हिच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर आयुषही चित्रपटसृष्टीचा एक भाग झाला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात चिमुरड्या अहिलचं आगमन झालं. अहिलच्या येण्यानं अर्पिता- आयुषचं कुटुंब पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही.

अभिनव कोहली- टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनेता अभिनव कोहली यांनी जवळपास तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या अभिनव आणि श्वेता एका गोंडस मुलाचे पालक आहेत.

कथा पडद्यामागचीः नाटक करणं ही माझी गरज- पुष्कर श्रोत्री

हरभजन सिंग- क्रिकेटपटू हरभजन सिंग जरी क्रीडाविश्वातील सेलिब्रिटी असला तरीही गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजन कार्यक्रम आणि रिअॅलिटी शोच्या मंचावरील त्याचा वावर पाहता तोसुद्धा एक सेलिब्रिटीच झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. अभिनेत्री गीता बसरासोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर हिनायाच्या येण्याने गीता- हरभजनचं कुटुंब पूर्ण झालं. हरभजन नेहमीच सोशल मीडियावर हिनायाचे काही सुरेख फोटो पोस्ट करत असतो.

करणवीर वोहरा- एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता करणवीर वोहरा आणि त्याची पत्नी टीजेसुद्धा सध्या आई-बाबांच्या भूमिकेत चांगलेच रुळले आहेत. ‘मिको’ आणि ‘नोनू’लाच करण-टीजे प्राधान्य देत आहेत.

सैफ अली खान- बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा हा पहिलाच फादर्स डे नाहीये. पण, तैमुरच्या दृष्टीने पाहायचं झालं तर एका अर्थी सैफही नव्याने फादर्स डे साजरा करणार असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entertainment celebrity dads first fathers day shahid kapoor saif ali khan harbhajan singh and karan johar photos
First published on: 14-06-2017 at 11:32 IST