Latest Entertainment News Today 30 April 2025: नेहा कक्कर तिच्या मेलबर्नमधील कॉन्सर्टमुळे मोठ्या चर्चेत आली होती. या कॉन्सर्टला ती उशीरा पोहोचली. त्यामुळे भडकलेल्या चाहत्यांनी तिला परत जाण्यास सांगितले.
आता ऑस्ट्रेलियामध्ये ज्या कंपनीने नेहाचा कॉन्सर्ट आयोजित केला होता. त्यांनी मोठा खुलासा केला आहे. नेहाने ७०० लोकांसाठी परफॉर्म करण्यास नकार दिला. त्यामुळे तिला कॉन्सर्टमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. तसेच तिला मानधन न दिल्याबद्दल ती खोटे बोलली आहे, असा दावा आयोजकांनी केला आहे.
तसेच, ‘हाऊसफुल ५ ‘चा टीझर प्रदर्शित झाला आहे. समंथा रुथ प्रभूने नुकताच तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केला आहे. जावेद अख्तर यांनीदेखील पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य केले आहे. या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी तिचे मंदिर बांधल्याचे समोर आले आहे. मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Housefull 5 Teaser Release News Update 30 April 2025: मनोरंजन लाईव्ह अपडेट ३० एप्रिल २०२५
…तर राजेश खन्ना आज जिवंत असते; दिग्गज अभिनेत्री मुमताज म्हणाल्या, "डिंपल कपाडिया…"
"किती दारू पितोस…", 'लक्ष्मी निवास' फेम विश्वाने सांगितला किस्सा, म्हणाला, "एका कोळीणबाईने…"
'इंडिया गॉट लेटेंट'च्या वादानंतर आशिष चंचलानीचे पुनरागमन
काही दिवसांपूर्वी 'इंडिया गॉट लेटेंट' हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानामुळे हा शो अडचणीत आला होता. समय रैना, रणवीर अलाहाबादिया यांच्याबरोबरच आशिष चंचलानीचे या वादात नाव समोर आले होते. आता इंडिया गॉट लेटेंटच्या वादानंतर आशिष चंचलानी पुनरागमन करत आहे.
आशिष चंचलानी एका हॉरर-कॉमेडी सीरीजची पटकथा लिहिणार असून तो ही सिरीज दिग्दर्शितदेखील करणार आहे. ही सिरीज या वर्षाच्या अखेरीस यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर या सिरीजमधील काही पात्रांचे पोस्टर शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/DJD7-M0IIak/?utm_source=ig_web_copy_link
Video: "आजवर तुझ्याशी चुकीचं…", भैरवी तिच्या चुकांसाठी सावलीची माफी मागणार; 'सावळ्याची जणू सावली'मध्ये पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
"आधी मला कायम माझ्या दिसण्यावर न्यूनगंड होता, पण सुनयनाने…", कुशल बद्रिकेने बायकोसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाला…
आमिर खानच्या '३ इडियट्स'मधील 'ती' शाळा आठवते का? २४ वर्षांनी मिळाली 'ही' मान्यता, नेमका इतिहास काय आहे?
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घातली पाहिजे का? जावेद अख्तर म्हणाले, "पाकिस्तानमध्ये लता मंगेशकर यांचा…"
रुपाली भोसलेने 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाली, "आपल्याला आणखी..."
मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेने 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या रुपाली गांगुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आपल्याला आणखी फोटोंची गरज असल्याचे म्हटले आहे. रुपाली जेव्हा रुपालीला भेटते, असेही तिने लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/DJD0bMzTGn4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाने २० दिवसात किती केली कमाई?
बॉलीवूड अभिनेता सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला 'जाट' हा चित्रपट १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने २० दिवसात ८३.३ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ९० कोटींचा टप्पा गाठेल. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला केसरी २ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले.
"तोपर्यंत मी लीलाला…", एजेने लीलाबाबत घेतलेल्या निर्णयाने सुनांना धक्का बसणार; 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये ट्विस्ट
'सीआयडी' फेम अभिनेत्रीने घेतली मंगेशकर कुटुंबाची भेट; फोटो शेअर करीत म्हणाली...
'सीआयडी' फेम अभिनेत्री श्रद्धा मुसळेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने सीआयडीमधील इतर कलाकारांसमवेत उषा मंगशेकर आणि मीना मंगेशकर यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने मंगेशकर कुटुंबाकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
https://www.instagram.com/p/DJCHvBWIENY/?utm_source=ig_web_copy_link
करिश्मा कपूरने शेअर केला राज कपूर यांच्याबरोबरचा फोटो
करिश्मा कपूरने सोशल मीडियावर राज कपूर यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने हा पहिल्या डान्सचा फोटो असल्याचे तिने म्हटले आहे. याबरोबरच तिने असेही लिहिले की यापेक्षा चांगला डान्स पार्टनर मिळू शकला नसता.
https://www.instagram.com/p/DJCXkw7N5cn/?utm_source=ig_web_copy_link
'झापुक झुपूक' हा डायलॉग सूरज चव्हाणचा नाही…; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा दावा; म्हणाला, "कमीत कमी खरं …"
'हाऊसफुल ५ 'चा धमाकेदार टीझर; फक्त कॉमेडी नाही तर किलर कॉमेडी दिसणार, पाहा
डान्स व्हिडीओवर मुलगा अमेयची काय प्रतिक्रिया असते? ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी दिलं 'हे' उत्तर, ट्रोलर्सलाही सुनावलं
पहलगाम हल्ल्यावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ ला हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. कलाकारांनीदेखील मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला.
आता जावेद अख्तर यांनीदेखील पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य केले आहे. जावेद अख्तर यांनी नुकताच एएनआयशी संवाद साधला. ते म्हणाले की दर काही महिन्यांनी, वर्षांनी असे हल्ले होतात. त्यामुळे चिंता वाटते.
पाकिस्तानने कितीही म्हटले की आमचा या दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाही, तर हे दहशतवादी कुठे जातात? इथून पळून ते जर्मनीला जाऊ शकत नाहीत. कारण- भारताला जर्मनीची सीमारेषा नाही. हे सगळं करून त्यांना काय मिळेल, हे समजत नाही. पर्यटकांवर गोळीबार करून त्यांना काय मिळाले? असे हल्ले झाल्यानंतर काही दिवस चर्चा होतात. त्यानंतर सगळे विसरुन जातात. यावेळी सरकारने काही ठोस पाऊले उचलली पाहिजेत.
"बाळा, काळजी करू नकोस…", खचलेल्या सूरजला मोठ्या भावाने धीर दिला; पंढरीनाथ कांबळेंनी केला Video कॉल, म्हणाले…
'चल भावा सिटीत'मधील गावरान ब्रोज गोव्याची सफर करणार, पाहा व्हिडीओ
'चल भावा सिटीत' मधील स्पर्धक गोव्याला जाणार आहेत. तिथे त्यांना विविध टास्क करावे लागणार आहेत. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/DJDiekKB_H7/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये मराठी चित्रपटाचा डंका; वैभव मांगले व छाया कदम यांचा 'हा' चित्रपट दाखवला जाणार
गजेंद्र विठ्ठल अहिरे दिग्दर्शित 'स्नो फ्लॉवर'या चित्रपटाचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंग होणार आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
https://www.instagram.com/reel/DJBwUfrNB30/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
नेहा कक्कर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...