Nirmal Kapoor Passes Away: बॉलीवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर, अभिनेते अनिल कपूर व संजय कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी (२ मे रोजी) वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. निर्मल कपूर या ज्येष्ठ निर्माते सुरिंदर कपूर यांच्या पत्नी होत्या. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला होता.

निर्मल कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनानंतर बोनी कपूर भाऊ अनिल कपूरच्या घरी पोहोचले. तसेच जान्हवी कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, अंशुला कपूर हे देखील काका अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले. अनन्या पांडे, भावना पांडेसह इतर बॉलीवूड सेलिब्रिटीही अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी निर्मल कपूर यांना श्रद्धांजली वाहून कपूर कुटुंबाला धीर दिला. निर्मल कपूर यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Live Updates

Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट

19:04 (IST) 3 May 2025

आई नर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला संजय दत्त, शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट, म्हणाला, "तू जरी माझ्याबरोबर नसली…"

Nargis Dutt Death Anniversary : संजय दत्तने इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या आईबरोबरचे न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. ...अधिक वाचा
17:57 (IST) 3 May 2025

अल्लू अर्जुनने चाहत्याला ढकललं, फोटो काढण्यास नकार दिला अन्…; नेटकरी म्हणाले, "तुमचे चित्रपट… "

Allu Arjun : अल्लू अर्जुनने फोटो काढण्यास दिला नकार ,लोक संतापले. ...सविस्तर बातमी
17:28 (IST) 3 May 2025

"वैयक्तिक टिपण्णी मला खटकते", ट्रोलर्सबद्दल रितेश देशमुखचं वक्तव्य; वडिलांनी दिलेल्या 'त्या' सल्ल्याबद्दल म्हणाला…

Riteish Deshmukh Talked About Criticism and Trolling : रितेश देशमुखला टीका-ट्रोलिंगचा करावा लागलेला सामना, तेव्हा वडिलांनी दिलेला 'हा' सल्ला ...सविस्तर बातमी
17:27 (IST) 3 May 2025

५ वर्षांचा संसार मोडला, २९ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, थाटामाटात केलेलं लग्न

Actress Sonyaa Ayoddhya Divorce : इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, फोटोही हटवले अन्... ...अधिक वाचा
16:26 (IST) 3 May 2025

कॉमेडियन कपिल शर्माची फॅट-टू-फिट जर्नी, दिला फिटनेसचा मंत्र; म्हणाला…

Kapil Sharma’s Stunning Transformation : अभिनेता कपिल शर्मा पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त झाला आहे, पण आता त्याचा नवीन व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. ...अधिक वाचा
16:06 (IST) 3 May 2025

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई, घरी चिमुकल्याचे झाले आगमन, आनंद व्यक्त करत म्हणाली…

Amruta Pawar Pregnancy News : 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' फेम अभिनेत्री झाली आई, घरी चिमुकल्याचे झाले आगमन, पोस्ट शेअर करत म्हणाली... ...अधिक वाचा
15:28 (IST) 3 May 2025

"भरपूर पैसे वाटले, पण..."; अनंत अंबानीने लग्नात २ कोटींचे घड्याळ न दिल्याने गायक नाराज

Anant Ambani and Radhika Merchant : लग्नात किती मानधन मिळालं? प्रसिद्ध गायक म्हणाला... ...सविस्तर वाचा
15:03 (IST) 3 May 2025

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची लगीनघाई, लग्नपत्रिका घेऊन पोहोचला कोकणातील कुलदेवतेच्या चरणी, म्हणाला…

Akshay Kelkar Get Married Soon : 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता लग्नपत्रिका घेऊन कुलदेवतेच्या चरणी, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला... ...अधिक वाचा
14:44 (IST) 3 May 2025

"हो, मी अशीच आहे…", बिपाशा बासूबरोबरच्या कॅट फाइटबद्दल अमीषा पटेलचं स्पष्ट वक्तव्य; म्हणाली…

Ameesha Patel On Bipasha Basu : अमिषा पटेल आणि बिपाशा बासू यांच्यात ३६ चा आकडा आहे. एकमेकांना एवढं सुनावलेलं की दोघींनी कधीच एकत्र काम केलं नाही. ...वाचा सविस्तर
13:35 (IST) 3 May 2025

…म्हणून माझ्या मुलींना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी पाठिंबा दिला नाही; अलका कुबल म्हणाल्या, "मी पडद्यावर रडले तरी…"

Alka Kubal Shares Thought on Film Industry: अलका कुबल यांच्या मुली कोणत्या क्षेत्रात काम करतात? वाचा ...सविस्तर वाचा
13:04 (IST) 3 May 2025

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात 'अबीर गुलाल'वर बंदी, वाणी कपूरने घेतला 'हा' मोठा निर्णय

Actress Vaani Kapoor On Abir Gulal : 'अबीर गुलाल' वरील बंदीनंतर, वाणी कपूर सावध, चित्रपटाबद्दल घेतला 'हा' निर्णय ...सविस्तर वाचा
12:46 (IST) 3 May 2025

कतरिना कैफ 'त्या' व्हिडीओमुळे होतेय ट्रोल, नेटकरी ऐश्वर्या रायचं नाव घेत म्हणाले, "तीच बोरिंग हेअरस्टाईल अन्…"

Katrina Kaif : कतरिनाची झलक पाहून लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. ...वाचा सविस्तर
12:40 (IST) 3 May 2025

"रोम हे दरोडेखोरांचं केंद्र", भारती सिंग स्पष्टच बोलली; इटलीतील 'तो' प्रसंग सांगत म्हणाली, "ते भारतीयांना लुटतात कारण…"

Bharti Singh and Haarsh Limbachiyaa Robbed in Europe : भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांची इटलीत झालेली लूटमार, स्वत:च सांगितला 'तो' प्रसंग ...सविस्तर बातमी
11:27 (IST) 3 May 2025

पहलगामबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे सोनू निगम अडचणीत, गायकाविरुद्ध तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

Sonu Nigam : सोनू निगमने भर कॉन्सर्टमध्ये पहलगाम हल्ल्याचा केला उल्लेख, 'त्या' व्यक्तव्यामुळे गायकाविरोधात तक्रार दाखल, जाणून घ्या... ...अधिक वाचा
11:15 (IST) 3 May 2025

'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात विनायक माळीसाठी निक्की तांबोळीचा आगरी भाषेत उखाणा, म्हणाली "चांदीच्या वाटीत…"

विनायक माळीसाठी निक्की तांबोळीचा हटके उखाणा म्हणाली... ...सविस्तर वाचा
11:14 (IST) 3 May 2025

'महाराज'पेक्षा दमदार कथा अन् 'दृश्यम'हून दमदार क्लायमॅक्स! OTT वरील 'हा' चित्रपट पाहून डोकं चक्रावेल

Best Suspense Thriller Film : ...अधिक वाचा
09:11 (IST) 3 May 2025

Boney Kapoor on Mother Death - आईच्या निधनाबद्दल बोनी म्हणाले...

Boney Kapoor on Mother Death - बोनी कपूर यांनी आई निर्मल कपूर यांच्या निधनाबद्दल पोस्ट केली आहे. ती भरभरून आयुष्य जगली, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

https://www.instagram.com/p/DJKo8a0z0X2/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

09:00 (IST) 3 May 2025

रितेश देशमुखच्या Raid 2 चा जलवा! दोन दिवसांत वसूल केले ८० टक्के बजेट, एकूण कलेक्शन 'इतके' कोटी

Raid 2 Box Office Collection Day 2 : 'रेड 2' ने दोन दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या ...सविस्तर बातमी
08:06 (IST) 3 May 2025

Nirmal Kapoor Passes Away: निर्मल कपूर यांचे निधन

Nirmal Kapoor Passes Away: बॉलीवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर, अभिनेते अनिल कपूर व संजय कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी (२ मे रोजी) वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

anil kapoor mother nirmal kapoor death

जान्हवी कपूरच्या आजीचे उपचारादरम्यान निधन

निर्मल कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.