बॉलिवूड म्हटलं की ग्लॅमर आणि फॅशन असं म्हटलं जातं. बॉलिवूडमध्ये स्टार किड्सना कोणतीही मेहनत न करता काम मिळते असे म्हटले जाते. तर चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या बॉलिवूडच्या बाहेरच्या व्यक्तीला कॉम्प्रोमाईजचा सामना करावा लागतो असं म्हटलं जातं. अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. दरम्यान, आता अभिनेत्री ईशा गुप्ताने तिला आलेला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव सांगितला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ईशाने हा खुलासा केला आहे.
ईशाने नुकतीच ‘बॉलिवूड बबलला’ मुलाखत दिली. यावेळी ईशाने कास्टिंग काऊच अनुभव सांगितला आहे. “दोन व्यक्तींसोबत मला हा अनुभव आला आहे. त्यापैकी एकासोबत मी चित्रपट केला. त्यांना वाटलं की तिच्यासोबत चांगलं बोलू आणि नंतर तिच्या रुममध्ये जाऊ. पण मी हुशार होती. मी म्हणाले, मी एकटी रुममध्ये झोपणार नाही असं मी सांगितलं. मी माझ्या मेकअप आर्टीस्टला माझ्यासोबत रुममध्ये झोपायला सांगायचे. तेव्हा मी अनेकांना कारणं दिली मी घाबरते, त्यामुळे मी इथे एकटी झोपू शकणार नाही. पण प्रत्यक्षात मला कोणत्या भूताची भीती नव्हती तर त्या माणसाची भीती वाटत होती. मी एका व्यक्तीचे घाणेरडे रूप पाहिले होते, त्यामुळे मी खूप घाबरले होते,” असे ईशा म्हणाली.
आणखी वाचा : रसिका सुनील अडकली लग्नबंधनात; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती
पुढे आणखी एक अनुभवर सांगत ईशा म्हणाली, “एक अशी वेळ होती की चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना मध्येच मला निर्मात्याने सांगितले की त्याला मी चित्रपटात नको आणि हे सगळी गोष्ट चित्रीकरणाला ५ दिवस झाल्यानंतरची आहे. खरं तर, मी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने मला चित्रपटातून काढून टाकायचे होते.”
आणखी वाचा : ‘लग्नाचा वाढदिवस विसरलो तर…’, जया बच्चन काय करतात अमिताभ यांनी केला खुलासा
पुढे बॉलिवूडमधील स्टारकिड्सना या गोष्टींचा सामना करावा लागत नसल्याचं म्हणतं ईशा म्हणाली, “स्टारकिड्सना काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही. कारण त्यांना त्यांच्या पालकांचा राग सहन करायचा नाही. पण बाहेरच्या लोकांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो.”
आणखी वाचा : काजोलचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी केली उर्फी जावेदशी तुलना म्हणाले…
ईशाने ‘जन्नत २ चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. ईशाने ‘राज ३डी’, ‘रुस्तम’, ‘बादशाहो’, ‘कमांडो २’ शिवाय काही तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.