बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांसह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर हा लवकरच तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे आमिर लवकरच फातिमासोबत लग्न करणार असल्याचेही बोललं जात आहे. मात्र त्यापूर्वी त्या दोघांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे त्या दोघांनाही फार ट्रोल केले जात आहे.

येत्या काही दिवसात आमिर तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा समोर येत आहे. आमिर ‘लाल सिंग चढ्ढा’ हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे, असे म्हटले जाते. हा चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर तो लग्नाची घोषणा करणार असल्याचे समोर येत आहे. मात्र त्या दोघांनी लग्न केल्याचा दावा अनेक सोशल मीडिया अकाऊंटद्वारे केला जात आहे.

एका फेसबुक पेजवर या दोघांचेही एकत्र फोटो शेअर करण्यात आले आहेत. फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये आमिर आणि फातिमाचा एकत्र फोटो पाहायला मिळत आहे. या फातिमा ही साडी घालून तर आमिर हटके अंदाजात दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोला कॅप्शनही देण्यात आले आहे.

नोरा फतेहीच्या गाडीचा जबरदस्त अपघात, कार ड्रायव्हरने दिली रिक्षाला जोरदार धडक

“फातिमा शेख ही तीच अभिनेत्री आहे जिने दंगल चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटात फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती. आज तीच अभिनेत्री आमिर खानची तिसरी पत्नी बनली आहे. बरं ही त्याची वैयक्तिक बाब आहे, पण सत्यमेव जयतेचा प्रचार करणारा आमिर खान त्याच्या अनेक विवाह आणि पत्नींवर काही बोलणार आहे का?” असा प्रश्न या पोस्टद्वारे विचारण्यात आला आहे.

दरम्यान या फोटोद्वारे करण्यात आलेला दावा किती खरा किती खोटा याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. तसेच आमिर खानने पुन्हा लग्न केले आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आमिर आणि फातिमाचा व्हायरल होणाऱ्या या फोटोसोबत छेडछाड करण्यात आल्याचे समोर आलं आहे. आमिर आणि फातिमाचा व्हायरल होणारा हा फोटो आकाश अंबानी यांच्या साखरपुडादरम्यानचा आहे. या फोटोत आमिर आणि किरण राव एकत्र उभे आहेत. मात्र काहींनी तो फोटो एडिट करुन त्याजागी फातिमाचा चेहरा लावला आहे. त्यावेळी आमिर खानचा किरण रावशी घटस्फोट झाला नव्हता.

आमिर खानचं तिसरं लग्न खरंच होणार की…?; समोर आली नवी माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आमिर आणि फातिमा यांनी अद्याप अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितलेले नाही. पण आमिरच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व अफवा आहेत आणि योग्य वेळ आल्यावर आमिरही या सर्वांची उत्तरे देईल. सध्या तो त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.