दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित 2.0 चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या वर्षभरापासून वारंवार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात होती. अखेर २९ नोव्हेंबरला तेलगू, तामिळ, हिंदी भाषेत जगभरात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.  सर्वाधिक बजेट असलेला आशिया खंडातील  हा दुसरा तर भारतातील पहिला चित्रपट आहे. गेल्या दोन वर्षांपासून जगभरातील हजारो VFX तज्ज्ञ या चित्रपटासाठी काम करत आहेत. अर्थात चित्रपटात रजनीकांत आहे म्हटल्यावर दाक्षिणात्य प्रेक्षकांची गर्दी या चित्रपटासाठी जमणार हे निश्चित पण त्याही पलिकडे हा चित्रपट का पाहावा  याची पाच कारणं आपण पाहणार आहोत.

तंत्रज्ञान
2.0 हा 3D कॅमेरावर शूट केलेला पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातील VFX वर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. जगातील आघाडीची VFX कंपनी यासाठी काम करत होती. ३००० हजार तज्ज्ञांनी या चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची धुरा सांभाळली. त्यातले १००० हे केवळ VFX तज्ज्ञ होते. तंत्रज्ञान आणि कथा यांची उत्तम सांगड घालून हा चित्रपट तयार केला आहे त्यामुळे ते पाहण्यासाठी नक्की जावं.

कथा
2.0 हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या रोबोट चित्रपटाचा सिक्वल असला तरी तो आधीच्या चित्रपटापेक्षा खूपच वेगळा आहे, यात एक सामाजिक संदेशही दडला आहे त्यामुळे तो नक्की पाहावा असं या चित्रपटाचे दिग्दर्शक एस शंकर म्हणाले होते त्यामुळे सिक्वल असला तरी 2.0 ची कथा ही पूर्णपणे वेगळी असणार आहे असा विश्वास एस. शंकरसह रजनीकांत यांनीसुद्धा चाहत्यांना दिला आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमार 2.0 च्या निमित्तानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यातूनही या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारत आहे म्हणूनच अक्षयचा या चित्रपटातील अभिनय पाहण्यासाठी नक्की जावं.

मनोरंजन
रजनीकांत यांचा चित्रपट त्यातूनही दाक्षिणात्य चित्रपट असल्यानं मनोरंजानाचा भरपूर मसाला या चित्रपटात असणार आहे हे नक्की.

रजनी फॅक्टर
या सर्व कारणाबरोबर 2.0 पाहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रजनी फॅक्टर होय. सबकुछ रजनीकांत असलेल्या या चित्रपटात केवळ त्यांचा अभिनय पाहण्यासाठी एकदा तरी जावचं. वयाची ६० केव्हाच ओलांडलेल्या रजनीकांत यांनी सुरूवातीला तब्येतीच्या कारणावरून 2.0 करायला नकार दिला.

या चित्रपटात कठीण स्टंट असल्यानं रजनीकांत यांचा नकार होता. अखेर त्यांनी या चित्रपटात काम करायला बऱ्याच वर्षांनी होकार दिला. त्यामुळे ६७ वर्षांच्या रजनीकांत यांच्या अभिनयासाठी हा चित्रपटात नक्की पाहावा.