बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. तर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत राहिला होता. तर अभिनेता कमाल आर खानने या चित्रपटाचे समिक्षण करत रिव्ह्यू दिला आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. रिव्ह्यू देण्याआधी केआरकेने चित्रपटाला ट्रोल केले आहे. केआरके पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाला, “माझे काही मित्र ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट पाहून आले आणि त्यांनी मला सल्ला दिला की हा चित्रपट पाहायला जाताना एक पेन किलर घेऊन जा. आता मी हा चित्रपट पाहण्यासाठी जात आहे आणि मी माझ्या पॉकेटमध्ये दोन गोळ्या देखील घेतल्या आहेत.”

आणखी वाचा : “मलाच सगळं करावं लागत अन् माझ्या भावाला….”; अमिताभ बच्चन यांच्या नातीने घरात होणाऱ्या भेदभावावर केले होते वक्तव्य

या ट्वीटच्या काही तासानंतर केआरकेने पुन्हा एक ट्वीट केले आणि व्हिडीओ शेअर करत चित्रपटाच्या फर्स्ट हाफ विषयी सांगितले. व्हिडीओच्या सुरुवातीला रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाविषयी सांगताना केआरके बोलतो, “संपूर्ण जगात युद्धाचे वातावरण सुरु आहे. तर एकीकडे तुम्ही आणि मी युद्ध लढत आहोत.” केआरके म्हणाला, “गंगुबाई काठियावाडी पाहायला गेलो आणि आई शप्पथ फर्स्ट हाफ पूर्ण पाहिला. त्यानंतर मला असा धक्का बसला की सेकेन्ड हाफ पाहण्यासाठी थिएटरमध्ये परत कसा जाऊ. कारण सेकेन्ड हाफ पाहणे हे रशिया-युक्रेनच्या युद्धासारखे आहे. माझ्यासाठी हे युद्ध आहे, पण मी हे युद्ध लढणार आहे.”

आणखी वाचा : “ताई, घाई-घाईत पॅंट घरीच विसरल्या”; मलायकाचा विचित्र लूक पाहून नेटकरी झाले हैराण

खिशातून पेन किलर काढतं केआरके म्हणतो, “डोकं दुखल्यामुळे २ नाही ४ पेन किलर घ्याव्या लागल्या तरी मी चित्रपट पूर्ण बघेन. मी प्रामाणिकपणे चित्रपट पाहतो आणि नंतर रिव्ह्यू देतो, चांगला असेल तर मी चांगला सांगतो आणि वाईट असेल तर वाईट. सेकेन्ड हाफ पाहायला जाताना मला भीती वाटते, वेडा झालो किंवा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तरी चालेल पण चित्रपट नक्की बघणार.”

आणखी वाचा : ‘विक्रम वेधा’तला सैफचा लूक पाहून करीना म्हणाली, “माझा पती आधीपेक्षा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.