बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफचे लाखो चाहते आहेत. सैफ लवकरच अभिनेता हृतिक रोशनसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसणार आहे. तर सैफ आणि हृतिक मोठया पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, विक्रम म्हणजेच सैफचा फस्ट लूक हृतिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच सैफसोबत काम करण्याता त्याचा अनुभव त्याने सांगितला आहे. तर करिनाने सैफचा लूक शेअर करत तिला प्रचंड आवडला असे सांगितले आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सैफचा हा फोटो शेअर केला आहे. यात सैफने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला असून त्याचा डॅशिंग लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. करीना सैफचा हा लूक शेअर करत, “माझा पती आधी पेक्षा जास्त हॉट आहे. याची प्रतिक्षा करू शकत नाही”, असे कॅप्शन करीनाने दिले आहे.

आणखी वाचा : ‘यांना थोडा शिष्टाचार शिकवा…’ एअर हॉस्टेसच्या वागणुकीवर संतापली अभिनेत्री

आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका

तर सैफचा हा लूक शेअर करत हृतिक म्हणाला, “एक अप्रतिम कलाकार आणि सहकर्मीसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. ज्या कलाकाराच्या अभिनयाची मी स्तुती करत होतो. एक असा अनुभव येणार जो मला कायम लक्षात राहिल. प्रतिक्षा करू शकत नाही.”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विक्रम वेधा हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, विक्रम वेधा या चित्रपटाची पटकथा ही विक्रम वेताळ या मायथॉलॉकिल कहानीवरून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात सैफ अली खान पोलिस असणार आहे. तर हृतिक रोशन हा गँगस्टर.