scorecardresearch

“मी कार्यक्रम बंद करणार नाही कारण…”, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका

गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी, नृत्यांगणाने मांडली भूमिका

gautami patil
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. अशाच एका कार्यक्रमात गौतमीचा डान्स बघायला आलेल्या प्रेक्षकाचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणी गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा असी मागणी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती. 

गौतमीच्या एका लावणी कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावर गौतमीने भाष्य केलं आहे. ‘टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने स्पष्टीकरण दिलं आहे. “ग्रामीण भागातील प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. लोकांच्या प्रेमामुळं मी आज इथे आहे. मी एक कलाकार आहे. गावोगावी जाते आणि कार्यक्रम सादर करते. सुरुवातीला काही चुका झाल्या असतील. पण, आता सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे”, असं ती म्हणाली.

हेही वाचा>> लग्नाआधीच गरोदर असण्याच्या चर्चांवर देवोलिना भट्टाचार्जीने सोडलं मौन, म्हणाली…

हेही वाचा>> “तेच, असे किती आले आणि गेले…”, मानसी नाईकच्या पोस्टने वेधलं लक्ष

गौतमी पाटीलची महत्त्वाकांक्षा काय आहे? पुढे ती काय करताना दिसणार आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सध्या मला गाण्यांसाठी विचारणा होत आहे. माझा चित्रपटही येत आहे. आणखी चित्रपट व गाणी आली तर मी नक्कीच करेन. माझे कार्यक्रमही होतच राहतील. ते मी बंद करणार नाही”.

हेही वाचा>> कॅप्टन्सी टास्कदरम्यान सदस्यांनी गमावले तब्बल १७ लाख; ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणार फक्त ‘इतकी’ रक्कम

लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचे लावणी कार्यक्रमातील अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विभत्स हावभाव व भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून लावणी डान्स करतानाचा तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 14:24 IST

संबंधित बातम्या