बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून ही येतं. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि विनोदी व्हिडीओ शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. जिनिलिया ही नेहमीच इन्स्टाग्रामवरुन विविध व्हिडीओ शेअर करताना दिसते. कधी ती रितेश देशमुखसोबत तर कधी मुलांसोबत विनोदी व्हिडीओ करताना दिसते. नुकतंच जिनिलियाने तिच्या मुलासोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने “तू कोण आहेस?” असा प्रश्न मुलाला विचारला आहे.

जिनिलिया ही नेहमीच मुलांसोबत वेळ घालवताना पाहायला मिळते. नुकतंच तिने तिच्या मोठा मुलगा रियानसोबत एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात जिनिलिया व्हिडीओच्या सुरुवातीला “Hii Guys, ही मी आहे आणि हा… तू कोण आहेस रे?” असा प्रश्न विचारताना दिसते.

जिनिलियाचा हा प्रश्न पाहून रियान दोन सेकंद गोंधळात पडतो. त्यावेळी त्याचे हावभाव फार सुंदर दिसतात. तर दुसरीकडे या व्हिडीओत जिनिलियाही फार क्यूट दिसत आहेत. यात तिचा नेहमी दिसणारा निरागस स्वभाव पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर फार मजेशीर कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जेनेलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि रेहाल अशी दोन मुले आहेत.