सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत असताना काल मोठा राजकीय भूकंप घडला. अजित पवार यांनी काही समर्थक आमदारांच्या साथीने शिंदे फडणवीस गटाशी हातमिळवणी केली. काल अजित पवार महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले. तर आज अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आज गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यात आनंदाश्रम येथे एक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रम सोहळ्यादरम्यान शिव चित्रपटसेनेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. यावेळी काही प्रसिद्ध मराठी कलाकारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आणखी वाचा : अक्षया देवधरची नवी सुरुवात! पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

हेही वाचा : “अजित पवारांच्या महायुतीत येण्याने आम्ही…”, शिंदे गटाचं वक्तव्य; म्हणाले, “आमच्यात मतभेद…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचके या कलाकारांनी आज शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळचे अनेक फोटो होत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाउंटवरून या पक्षप्रवेशाचा लाईव्ह व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.