प्रसिद्ध पंजाबी मॉडेल-गायक हिमांशी खुराना हिने बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळवली आहे. तुम्ही म्हणाल आता यात विशेष, असे कित्येक कलाकार या शोमध्ये येतच असतात. त्यात आता आणखी एका स्पर्धकाची भर पडली. परंतु हिमांशीबाबत गंमतीशीर बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत बिग बॉस हा असंस्कारी लोकांचा शो आहे, असे म्हटले होते. त्यावेळी बिग बॉसच्या १३व्या पर्वात कोणते कलाकार झळकणार याबाबत चर्चा होती. या चर्चेत हिमांशी खुराना हे नाव आघाडीवर होते. परंतु दरम्यान झालेल्या एका मुलाखतीत तिने बिग बॉसमध्ये भाग घेण्यास आपण इच्छूक नसल्याचे जाहिर केले होते.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Punjab se aayi ek aur kudi #HimanshiKhurana, kya yeh dengi humari #KatrinaKaif ko competition? Dekhne ke liye tune-in to #BiggBoss13, Mon-Fri, 10.30 PM & Sat-Sun, 9 PM!
Anytime on @justvoot @BeingSalmanKhan @Vivo_india #BiggBoss #BB13 #SalmanKhan pic.twitter.com/kPwH2QG3ps
— COLORS (@ColorsTV) November 2, 2019
“बिग बॉस हा असंस्कारी आणि रिकामटेकड्या लोकांचा खेळ आहे. या खेळात भाग घेण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. शिवाय माझे आई-वडिल बिग बॉसमध्ये भाग घेण्यास मला सहमती देणार नाही.” असे तिने म्हटले होते. परंतु आता ती याच असंस्कारी लोकांच्या स्पर्धेत भाग घेणार आहे.
अलिकडेच देवोलीना, रश्मि देसाई आणि शेफाली बग्गा या तीन स्पर्धकांचे बिग बॉसमधून एलिमिनेशन झाले होते. या तीन अभिनेत्रींच्या जागेवर पहिल्यांदा काटा लगा फेम शेफाली जरीवालाची एंट्री झाली आणि आता हिमांशी खुराना लवकरच या शोमध्ये झळकणार आहे. कलर्स वाहिनीच्या ट्विटर हँडलवरुन या नव्या स्पर्धकाबाबत प्रेक्षकांना माहिती देण्यात आली आहे.