Hollywood Actor Christian Oliver with His 2 Daughters Killed In Plane Crash : प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता व त्याच्या दोन मुलींचे अपघाती निधन झाले आहे. जर्मन वंशाचा हॉलीवूड अभिनेता क्रिश्चियन ऑलिव्हर त्याच्या दोन लहान मुलींसह अपघातात मृत्यू पावला आहे. ते प्रवास करत असलेले छोटे विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच कॅरेबियन समुद्रात कोसळले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

‘एनडीटीव्ही’ ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द गुड जर्मन’ आणि ‘स्पीड रेसर’ या चित्रपटांमध्ये झळकलेला क्रिश्चियन ऑलिव्हर गुरुवारी खासगी विमानाच्या अपघातात मुलींसह मरण पावला. असे रॉयल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलीस फोर्सने एका निवेदनात म्हटले आहे. ५१ वर्षीय ऑलिव्हर, त्याच्या मुली मॅडिटा (१० वर्षे) आणि अॅनिक (१२ वर्षे) आणि पायलट रॉबर्ट सॅक्स अशी मृतांची नावे आहेत.

junaid khan was denied entry at maharaj screening
“हा आमिर खानचा मुलगा आहे?” रिक्षामध्ये आलेल्या जुनैद खानला त्याच्याच सिनेमाच्या स्क्रीनिंगला अडवलं, दिग्दर्शकाने सांगितला किस्सा
Shiv Sena deputy leades son hit a couple with a car Mumbai
धनिकपुत्राची दांडगाई! शिवसेना उपनेत्याच्या मुलाची मोटारीने दाम्पत्याला धडक, दोन किलोमीटरपर्यंत फरफटल्याने महिलेचा मृत्यू
Mahendra Singh Dhoni's 43rd birthday
MS Dhoni Birthday : माहीने सलमान खानच्या उपस्थितीत कापला केक, पत्नी साक्षीच्या ‘त्या’ कृतीने वेधले सर्वांचे लक्ष, पाहा VIDEO
Worli Hit and Run Case
“BMW चालकानं गाडी पळवली नसती तर…”, वरळीतील अपघातावर मनसेच्या संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया
ambani family dances on shah rukh khan om shanti om song
Video : ‘ओम शांती ओम’, शाहरुख खानच्या गाण्यावर अंबानी कुटुंबाचा जबरदस्त डान्स! जावई आनंद पिरामलही थिरकले
Vicky Kaushal has Katrina Kaif childhood photo on phone wallpaper viral on social media
विकी कौशलच्या फोनचा वॉलपेपर होतोय व्हायरल, फोटोमध्ये आहे कतरिनाच्या बालपणाची आठवण
heart touching video about mother and son Must watch
शेवटी आईचं ती! रस्त्याच्याकडेला बाळाला घेऊन बसलीये महिला, आईचा लेकरावर प्रेमाचा वर्षाव, पाहा हृदयस्पर्शी Video
Pawan Kalyan was the one who left me
“त्याने मला सोडलं आणि पुन्हा लग्न केलं”, ट्रोल करणाऱ्याला प्रसिद्ध अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीने सुनावलं; म्हणाली, “अशी मूर्खासारखी…”

Video: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर, प्रेमाची कबुली दिल्यानंतर शिखरसह पोहोचली देवदर्शनाला

मच्छीमार आणि तटरक्षक ताबडतोब घटनास्थळी गेले आणि त्यांनी चारही मृतदेह बाहेर काढले. हे विमान ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून गुरुवारी मध्यरात्रीनंतर सेंट लुसियाला जात होते. ऑलिव्हर मुलींबरोबर नवीन वर्षानिमित्त व्हेकेशनसाठी इथे आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

क्रिश्चियन ऑलिव्हरने आतापर्यंत ६० हून अधिक चित्रपट व टीव्ही मालिका केल्या आहेत. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. ऑलिव्हर व त्याच्या मुलींना चाहते श्रद्धांजली वाहत आहेत.