अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ५’ चित्रपटगृहात येत असताना चाहत्यांचा उत्साहही द्विगुणीत होत आहे. त्याच वेळी स्टारकास्ट आणि निर्माते चित्रपटाच्या प्रचार व प्रसिद्धीमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. रविवारी संध्याकाळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट एका प्रसिद्धीनिमित्तच्या कार्यक्रमासाठी पुण्यात पोहोचली होती. त्यादरम्यान निर्मात्यांनी खुलासा केला की, चित्रपटाचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे.

ही घोषणा होताच लोकांनी लगेचच चित्रपटाचे तिकीट बुक करण्यास सुरुवात केली. ‘हाऊसफुल ५’ शुक्रवारी (६ जून) प्रदर्शित होत आहे म्हणजेच अ‍ॅडव्हान्स बुकिंग आणखी चार दिवस सुरू राहील. अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी पहिल्या दिवसाच्या शोचे बुकिंग केले आहे.

‘हाऊसफुल ५’चा ट्रेलर पाच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. एका सुपरहिट फ्रँचायजीव्यतिरिक्त या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करणाऱ्या दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे त्याची स्टारकास्ट, ज्यामध्ये १९ स्टार आहेत. दुसरी म्हणजे त्याचे दोन क्लायमॅक्स. तिकीट बुकिंग करतानाही प्रेक्षकांना ‘हाऊसफुल ५ ए’ आणि ‘हाऊसफुल ५ बी’ यापैकी एक निवडण्यास सांगितले जात आहे.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगची कमाई

ईटाइम्सच्या अहवालानुसार, ‘हाऊसफुल ५’ने पहिल्या दिवशी ७,५९८ शोमध्ये २४,६२ लाख तिकिटे विकून अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे ९०.८८ लाख रुपये कमावले आहेत. या आकड्यामध्ये ब्लॉक बुकिंग वगळता, एकूण कमाई २.९७ कोटी रुपये आहे. अशा प्रकारे चित्रपटाने केवळ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ३.८८ कोटी रुपये कमावले आहेत.

हिंदी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स प्रदर्शित होणार आहेत. बुकिंगदरम्यान, ‘हाऊसफुल ५ए’ व ‘हाऊसफुल ५बी’चे दोन पर्याय उपलब्ध असतील. निर्मात्यांनी एकाच चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स प्रदर्शित करून प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

‘हाऊसफुल ५’चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे आणि निर्माते साजिद खान यांनी त्याची कथा लिहिली आहे. अक्षय कुमारव्यतिरिक्त अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, श्रेयस तळपदे, दिनो मोरिया, रणजित, सौंदर्या शर्मा, निकितीन धीर, जॉनी लिव्हर व आकाशदीप साबीर हे या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील आठवड्यात शुक्रवारी (६ जून) प्रदर्शित होत आहे.