Housefull 5 OTT Release : अक्षय कुमारचा मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल ५’ ६ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट केवळ त्याच्या स्टारडम कास्टमुळेच नाही तर त्याच्या अनोख्या क्लायमॅक्समुळेही चर्चेत होता.

अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुखसारखे कलाकार या मल्टीस्टारर चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. सर्वांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

खरंतर, हा चित्रपट ‘हाऊसफुल ५ए’ आणि ‘हाऊसफुल ५बी’ या दोन आवृत्त्यांसह प्रदर्शित झाला होता आणि मनोरंजक गोष्ट अशी होती की दोघांचाही क्लायमॅक्स वेगळा आहे. प्रेक्षकांना निर्मात्यांचा हा प्रयोग आवडला आणि त्याबरोबरच ‘हाऊसफुल ५’ ने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. आता तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘हाऊसफुल ५’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होईल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

‘हाऊसफुल ५’ ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होईल?

ज्यांनी थिएटरमध्ये ‘हाऊसफुल ५’ पाहणे चुकवले आहे, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की ते आता त्यांच्या घरी आरामात या कॉमेडी-थ्रिलरचा आनंद घेऊ शकतात. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी काही वृत्तांत असा दावा करण्यात आला आहे की, हा चित्रपट जुलैच्या अखेरीस ओटीटीवर स्ट्रीम होऊ शकतो. तर काही इतर वृत्तांनुसार, ‘हाऊसफुल ५’ १ ऑगस्ट रोजी ओटीटीवर येईल. याबद्दल अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. परंतु, लवकरच त्याचा डिजिटल प्रीमियर अपेक्षित असल्याची चर्चा आहे.

‘हाऊसफुल ५’ स्टार कास्ट

तरुण मनसुखानी दिग्दर्शित आणि फरहाद सामजी लिखित, हाऊसफुल ५ मध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, डिनो मोरिया, फरदीन खान, जॉनी लीव्हर, चंकी पांडे, रणजित, श्रेयस तळपदे, बॉबी देओल यांच्या भूमिका आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हाऊसफुल ५’ ही बॉलीवूडमधील पहिली पाच चित्रपटांची फ्रँचायझी आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या चार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती.