scorecardresearch

‘पेहला नशा’ गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री आयेशा जुल्काची नुकतीच हश हश या वेबसिरीजमध्ये दिसली आहे.

‘पेहला नशा’ गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल
bollywood actress share video

बॉलिवूडमध्ये नव्व्दच्या दशकात अनेक अभिनेते अभिनेत्री उदयास आले, बच्चनजींच्या ‘अँग्री यंग’ मॅनची क्रेझ कमी वव्हायला लागली होती. आमिर खान, शाहरुख खान, सलमान खानसारखे रोमँटिक अभिनेते चित्रपट गाजवत होते. तर दुसरीकडे अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण हे ऍक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध झाले. अभिनेत्रींनमध्ये माधुरी दीक्षित आपल्या नृत्याने, अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत होती. मनीषा, करिष्मा, रविना यासारख्या अभिनेत्री आपले स्थान निर्माण करत होत्या. यांच्यातच भर पडली ती एका गोड अभिनेत्रीची ती म्हणजे ‘आयेशा जुल्का’ या अभिनेत्रीची.

आयेशाचा सर्वात लक्षात राहणारा चित्रपट म्हणजे ‘जो जिता वही सिकंदर’, आमिर खानची प्रेयसीची भूमिका तिने या चित्रपटात केली होती. तरुणाई, कॉलेज विश्व, स्पर्धा अशा गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या. तरुणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले. चित्रपटाचे कथानक जमून आले होते मात्र यातील गाणी आजही रसिकांच्या लक्षात आहेत. पेहला नशा या गाण्याची क्रेझ आजही आहे. पहिल्या प्रेमाबद्दलचे गाणे आजही अनेकजण गुणगुणत असतात. अभिनेत्री आयेशा जुल्काने या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या इन्स्टग्राम अकाऊंटवर तिने गाण्यावर डान्स केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनीदेखील या व्हिडिओला आपली पसंती दर्शवली आहे.

PS-I चित्रपटातील अभिनेत्याने केला दावा, म्हणाला “यातील पात्र बघून तुम्हाला… “

१९९२ साली ‘जो जीत वही सिकंदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिर बरोबर पूजा बेदी, दीपक तिजोरी, कुलभूषण खरबंदासारखे कलाकार होते. मन्सूर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. जतीन ललित यांनी चित्रपटाला संगीत दिले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आमिरच्या कामाचे कौतुकदेखील झाले होते.

अभिनेत्री आयेशा जुल्काची नुकतीच ‘हश हश’ या वेबसिरीजमध्ये दिसली आहे. यामध्ये तिच्याबरोबर जुही चावला, सोहा अली खान दिसत आहेत. ही वेबसिरीज सस्पेन्स थ्रिलर आहे. तनुजा चंद्रा, कोपल नैथानी, आशिष पांडे यांनी वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. या वेबसिरीजमुळे अभिनेत्री आयेशा जुल्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०१८ साली आलेल्या ‘जिनियस’ चित्रपटात ती दिसली होती

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या