scorecardresearch

Premium

“मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा

या चित्रपटात तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा ही भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे.

“मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. तर दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला विचारण्यात आले होते. तिने स्वत: याबाबतचा दावा केला आहे.

चंद्रमुखी या चित्रपटात तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा ही भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे. मात्र या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकला विचारणा करण्यात आली होती, असा दावा तिने केला आहे. नुकतंच ई-टाईम्सशी बोलताना तिने याबाबत सांगितले आहे.

rajveer deol
‘प्रादेशिक चित्रपट बोलके असतात’
junior ntr saif ali khan and janhvi kapoor starrer telugu film devara
दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
rajamouli-made-in-india
‘भारतीय चित्रपटा’चा बायोपिक; एसएस राजामौलींच्या आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा
teen-adkun-sirtaram
‘तीन अडकून सीताराम’चा नेमका अर्थ काय? अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा खुलासा

‘चंद्रमुखी या चित्रपटासाठी तुला विचारणा करण्यात आली होती का? तू ही भूमिका साकारली असतीस का?’ असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर मानसी म्हणाली, “कदाचित मला हा चित्रपट ऑफर करण्यात आला असेल किंवा मला काय होणार याची माहिती असेल. त्यामुळे मला कदाचित त्यासाठी विचारणा करण्यात आली असावी. मी याबद्दल काहीही नाही बोललं तरच चांगलं आहे. पण माझे या संपूर्ण टीमला आशीर्वाद आहेत. त्या चित्रपटाचे लेखन करण्यापासून ते कॅमेराचे शूटींग या सर्वांसाठी मी फार खूश आहे. पण मला असे वाटतं की मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती.”

दरम्यान मानसी नाईकने केलेल्या या दाव्यावर चित्रपट निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही ‘चंद्रमुखी’साठी मानसी नाईकशी कधीही संपर्क साधला नाही, असे अक्षय बर्दापूरकर म्हणाले.

“…ती आता तुमच्यासमोर अवतरली आहे”, ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ साकारणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I think i would have been a better chandramukhi then amruta khanvilkar said famous marathi actress nrp

First published on: 24-03-2022 at 16:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×