भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूडचे सेलिब्रिटीसुद्धा खेळाडूंना प्रोत्साहित करत आहेत. सोशल मीडियावरसुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबाबत बरेच मिम व्हायरल होत आहेत. अनेकांनी विराट कोहलीचा फोटो शेअर करत सामनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि अशामध्ये बॉलिवूड कलाकारदेखील मागे नाहीत. भारतीय संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने विराट कोहलीचा फोटो शेअर करत, ‘भारतीय संघाला शुभेच्छा…चला जिंकूया’ असं कॅप्शनदेखील लिहिलंय. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘काला करिकालन’च्या निर्मितीसोबतच इतर अनेक प्रकल्पांमध्ये सध्या अभिनेता धनुष व्यग्र आहे. मात्र भारतीय संघाला प्रोत्साहित करण्यासाठी त्यानेही वेळ काढलाय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून धनुषने ‘ब्लीड ब्ल्यू…’ म्हणत सामनाविषयी आपली उत्सुकता व्यक्त केलीये. अभिनेत्री रविना टंडन आणि रणवी सिंग यांनीदेखील ट्विट करून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

VIDEO : ‘जब हॅरी मेट सेजल’चा मिनी ट्रेलर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाची टीमसुद्धा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सज्ज झालीये. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे हिंदी भाषेतून समालोचन करताना दिसला. तर रेड चिलीज ट्विटर हँडलवरून शाहरूख आणि दिग्दर्शक इम्तियाज अलीचा फोटो शेअर करण्यात आलाय. या फोटोसोबतच कॅप्शनमध्ये भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आले आहेत.