संपूर्ण देशभरात इंडियन आयडल पर्व ११चे ऑडिशन सुरु आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा आदित्य नारायणवर सोपावण्यात आली आहे तर नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. सध्या सोशल मीडियावर शोच्या ऑडिशनचे व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहेत. संपूर्ण देशातून एकापेक्षा एक स्पर्धक शोमध्ये सहभागी होतात. तर दुसरीकडे असे काही स्पर्धक पोहोचले आहेत ज्यांचा आवाज ऐकायची पण इच्छा होणार नाही. काही स्पर्धकांचा आवाज ऐकून परिक्षकांना डोकेदुखी झाली आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शोच्या परिक्षकांनी एका स्पर्धकाला खाऊ घातले आहे.

नुकताच ‘Bollywood Now’ या फेसबुक पेजने इंडियन आयडल ११च्या ऑडिशचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोचे परिक्षक अनु मलिक आणि विशाल दादलानी एका स्पर्धकाला खायला घालताना दिसत आहे. स्पर्धकाने गाणे गाण्यापूर्वी परिक्षकांकडे पाणी मागितले. नंतर विशाल आणि अनु यांनी त्याला स्नॅक्स ऑफर केले. स्पर्धकाने ते हवरटासारखे खाऊन घेतले.

स्पर्धकाचे खाणे पाहून तिन्ही परिक्षक त्याच्याकडे पाहात होते. अनु मलिकने तर त्याला संपवून टाक सगळं आम्हाला काही ठेवू नकोस असे म्हटले आणि त्या स्पर्धकाने अक्षरश: ते सर्व स्नॅक्स संपवून टाकले. त्याचे खाणे पाहून नेहा कक्करने त्याला आणखी काय हवय का? मिल्कशेक, पावभाजी असे विचारले. त्यावर कोणताही विचार न करता स्पर्धकाने मॅम फक्त डाळ-भात असे उत्तर दिले. ते ऐकून अनु मलिक आणि विशालने सेटवर डाळ-भात आणण्यास सांगितला. स्पर्धकाचे गाणे गावून झाल्यानंतर मंचावर जाऊन जेवण खाऊ घातलं. स्पर्धकाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल.