उदित नारायण यांचा मुलगा अभिनेता आणि गायक आदित्य नारायणचे लाखो चाहते आहेत. आदित्यने आता पर्यंत ए. आर रहमान, विशाल दादलानी आणि इलायराजा अशा अनेक संगीतकारांसाठी अनेक गाजलेली गाणी गायली आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत, आदित्यने ग्रॅमी अवॉर्ड जिंकण्याच्या त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले.

आदित्यने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत आदित्यने त्याच्या स्वप्नांविषयी सांगितले आहे. “मला ऑस्कर अवॉर्ड नको, ग्रॅमी हवा आहे. मी अजूनही तरूण आहे. माझ्याकडे बराच वेळा आहे. ग्रॅमी जिंकणारा आणि परफॉर्म करणारा पहिला भारतीय संगीतकार होण्यासाठी मला काम करायचं आहे. मला संपूर्ण जगाला दाखवून द्यायचं आहे की हा माणूस फक्त त्याच्याच भाषेत नाही तर आपल्या भाषेत देखील उत्तम गाणं गाऊ शकतो,” असं आदित्य म्हणाला.

त्याच्या ग्रॅमीच्या स्वप्नाबद्दल आदित्य म्हणाला, “आपल्याला माहित आहे की प्रत्येकाची स्वप्ने आणि आकांक्षा वेगळी असते आणि मला माझ्या देशाला एक ग्रॅमी मिळवून द्यायचा आहे. मला असेही वाटते की एकदा आपण हे सगळं करायचं ठरवलं तर हे सगळं मिळण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. माझा मला मिळणाऱ्या आशीर्वादांवर विश्वास आहे.

आदित्य पुढे म्हणाला, आतापर्यंत ज्या काही संधी त्याला मिळाल्या आहेत त्या सर्वोत्कृष्ट संधी आहेत. १०० गाणी न आवडणाऱ्या लोकांसाठी गाण्यापेक्षा तो ज्या लोकांचा आदर करतो त्यांच्यासाठी गाणी गायला त्याला आवडेल.

आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा

आदित्य नाराणय हा छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’चे सुत्रसंचालन करतो. गेल्या काही दिवसांपासून अमित कुमार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आदित्य चर्चेत होता.