गेल्या वर्षी करोना काळात सगळ्यात मोठा आणि पहिला धक्का बॉलिवूडला बसला तो अभिनेता इरफान खान यांच्या जाण्याचा. अभिनेता इरफान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा सोशल मीडियावर त्याच्या वडिलांचे फोटो टाकत असतो. आता त्याच्या पत्नी सुतापाने सुद्धा एक थ्रो बॅक व्हिडीओ शेअर केलाय. दिवंगत अभिनेता इरफान खान यांना पत्ते खेळणं आवडत नव्हतं. जर कुणी त्यांना पत्ते खेळण्यासाठी विचारलं तर ते पत्नी सोबत खेळण्यासाठी सांगायचे. व्हिडीओमध्ये पत्नी सुतापा या इरफान यांच्या टीमसोबत पत्ते खेळताना दिसून येतेय. यात इरफान मागे बसून चेहऱ्यावर स्माईल देत गाणे ऐकताना दिसत आहे.

हा व्हिडीओ इरफान खानचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’ च्या सेटवर शूट केलाय. त्यावेळी इरफानला अस्वस्थ वाटत होतं. सुतापा यांनी हा थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “तीन वर्षापूर्वी इरफानची टीम शूटिंगसाठी लंडनमध्ये गेली होती. त्यावेळी त्याला काहीसं अस्वस्थ वाटत होतं. त्याला पत्ते खेळणं कधीच आवडत नव्हतं. पण तो त्याची पुस्तकं वाचण्यात कायम व्यस्त असायचा. त्याने आम्हा सगळ्यांना त्याच्या मेकअप व्हॅनमध्ये पत्ते खेळताना पाहिलं होतं. मला तुझी खूप आठवण येतेय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sutapa Sikdar (@sikdarsutapa)

सुतापा यांनी शेअर केलेल्या या थ्रोबॅक व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला ‘उड जब जब जुल्फें तेरी’ हे गाणं ऐकायला येतंय. या व्हिडीओमधली इरफान खानच्या चेहऱ्यावरची स्माईल हायलाइटमध्ये दिसून येते. सुतापा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून इरफान खानचे फॅन्स खूपच भावूक झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स करत फॅन्स इरफान याच्या स्माईलचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता इरफान खान याने 29 अप्रैल 2020 रोजी जगाचा निरोप घेतला. त्याला ब्रेन ट्यूमर होता. लंडन इथे त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला दोन मुलं आहेत. यातील एक मोठा मुलगा बाबिल हा वडीलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पहिल्यापेक्षा जास्त सक्रिय झाला. इरफानची पत्नी सुतापा देखील सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असतात. इरफानच्या जुन्या आठवणींचे व्हिडीओज आणि फोटोज शेअर करत त्याच्या फॅन्सना आनंद देत असतात.