बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. ती अभिनयासोबतच तिच्या अनोख्या स्टाइलमुळे चर्चेत असते. पण सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसत आहे. दरम्यान ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोंवरुन ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
फोटो: ‘तू बॉलिवूडची पॉर्नस्टार आहेस’, बोल्ड फोटोशूटमुळे रश्मी देसाई झाली ट्रोल
View this post on Instagram
एका यूजरने कमेंट करत ‘ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नंट आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘मला असे वाटते की ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नंट आहे’ असे म्हटले आहे. या सर्व चर्चांवर ऐश्वर्या किंवा अभिषेकने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
सध्या ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या हे पुद्दुचेरीमध्ये आहेत. तेथे त्यांनी दाक्षिणात्य अभिनेते आर सरथकुमार आणि त्यांची मुलगी वरलक्ष्मी सरथकुमार यांची भेट घेतली. दरम्यान सरथकुमार यांचे संपूर्ण कुटुंब तेथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी एकत्र वेळ घालवला. दरम्यान त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.