…म्हणून ‘Border’ चित्रपटानंतर जे.पी. दत्ता यांच्या जीवाला होता धोका

स्वातंत्र्यदिन आला की जे पी दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ चित्रपटाची आठवण आवर्जून काढली जाते. पण हा चित्रपट बनवण्यासाठी मोठी रिस्क घ्यावी लागली होती.

J-P-Dutt-Border-Film

आज संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करतोय. आज प्रत्येक व्यक्ती ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाल्याचा आनंद साजरा करतोय. पण स्वातंत्र्यानंतरही एक लढा आहे जो आपल्या देशाचे सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढत आहेत. याचीच एक कथा दिग्दर्शक जे पी दत्ता यांनी ‘बॉर्डर’ चित्रपटातून सादर केली. ‘बॉर्डर’ चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर येत असतात.

जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या

देशभक्तीने प्रेरित अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये बनले आहेत. या चित्रपटांमध्ये जे.पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचे नाव सगळ्यात आधी येतं. पण हा चित्रपट बनवताना दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांना खूप पापड लाटावे लागले. या चित्रपटासाठी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. पण या धमक्यांना न घाबरता मोठ्या धाडसाने जे. पी. दत्ता यांनी हा चित्रपट बनवला आणि एका तरुणाच्या जीवनाचे सत्य लोकांसमोर खुले केले.

 

सुरक्षेसाठी बॉडीगार्ड्स ठेवले होते

‘बॉर्डर’ चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित होती. फोर्ब्ससाठी लिहिलेल्या कॉलममध्ये जे.पी. दत्ता यांनी सांगितले की, चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका होता, हे कळल्यानंतर त्यांना दोन सशस्त्र बॉडीगार्ड्स देखील देण्यात आले होते. ते बॉडीगार्ड्स नेहमी त्यांच्याबरोबर सावलीसारखे सोबत राहत होते आणि सुमारे 3-4 महिने ते जे.पी. द्त्ता यांना सुरक्षा देत होते.

 

कुटुंब विरोधात गेले होते

जे.पी. दत्ता यांनी LOC कारगिलवर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे कुटुंब त्यांच्या विरोधात होते. याबद्दल बोलताना जे.पी. दत्ता म्हणाले की, “मी माझ्या कुटुंबाशी वाद घातला होता. आपण सर्व कधी ना कधी एक दिवस मरणारच आहोत. जर सैनिक आपल्यासाठी उभे राहू शकतात, ते माझ्यासाठी आपले प्राण पणाला लावू शकतात, तर मग मी त्यांच्यासाठी का जीव धोक्यात घेऊ शकत नाही? मी मागे हटणार नाही. मी चित्रपट करणार आणि इतिहास घडवणार.”

‘चित्रपट पैसे कमवण्यासाठी बनलेला नव्हता…’

जे.पी. दत्ता पुढे म्हणाले की, ‘मी पैसे कमवण्यासाठी किंवा बॉक्स ऑफिससाठी चित्रपट बनवला नव्हता. मी तीन तास किंवा अडीच तासांचा चित्रपट करायचं ठरवलं नव्हतं. हा चार तासांचा चित्रपट होता आणि अधिकार्‍यांना भेटल्यावर मी तो कालावधी ठेवला होता. मी त्यांच्या मुलांना भेटलो, ते कसे मोठे झाले, कसे लढले. मी चित्रपटातील सीन कट केले असते तर मला त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या कथा चित्रपटातून काढून टाकाव्या लागल्या असत्या. मी त्या कुटुंबांना पुन्हा कधीही तोंड दाखवू शकलो नसतो.”

मोठ्या धाडसाने अखेर जे.पी. दत्ता यांनी ‘बॉर्डर’ चित्रपट तयार केला. त्यानंतर हळुहळु धमक्या देखील कमी होऊ लागल्या. त्यांना येणाऱ्या धमक्यांचा उद्देश हा फक्त त्यांना धडा शिवकण्यासाठी होता, असं बोललं जातं. या चित्रपटाची कहाणी कारगिल युद्धावर आधारित होती. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, सैफ अली खान, मनोज वाजपेयी, करीना कपूर, राणी मुखर्जी, ईशा देओल आणि रवीना टंडन यांच्या मुख्य भूमिका होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: J p dutta got life threat call after making border prp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या