Jaat Box Office Collection Day 2: सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. गुरुवारी (१० एप्रिल) रिलीज झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. ‘जाट’ च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

२०२३ मध्ये ‘गदर २’ मधून बॉक्स ऑफिस गाजवणारा सनी देओल आता ॲक्शन मसाला चित्रपट ‘जाट’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि चित्रपटगृहात दाखल होताच त्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

सनीच्या ॲक्शन अवतारापासून ते रणदीप हुड्डा या चित्रपटातील एका भयानक खलनायकाच्या भूमिकेपर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक होत आहे. ‘जाट’ सोशल मीडियावर ट्रेंड करत असून यासोबतच या चित्रपटाला चांगली ओपनिंगही मिळाली होती. मात्र दुसऱ्या दिवशी ‘जाट’च्या कमाईत घसरण झाली आहे.

‘जाट’चे २ दिवसांचे कलेक्शन

‘जाट’ने पहिल्या दिवशी ११.६ कोटी रुपये कमावले होते. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘जाट’ ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ७ कोटींची कमाई केली आहे. एकूण कमाई आता १८.६ कोटी रुपये झाली आहे.

‘गुड बॅड अग्ली’च्या कमाईतही घट

Good Bad Ugly Box Office Collection Day 2: अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ या तमिळ चित्रपटाची रिलीजआधीपासूनच खूप चर्चा होती. ज्यामुळे या ॲक्शन-कॉमेडी ड्रामाने धमाकेदार ओपनिंग केली. हा अजित कुमारच्या करिअरमधील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. मात्र, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनला मोठा फटका बसला असून त्यात ५० टक्क्यांहून जास्त घसरण झाली आहे.

‘गुड बॅड अग्ली’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ३०.९ कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘गुड बॅड अग्ली’ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी १३.५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची दोन दिवसांची एकूण कमाई आता ४३.०४ कोटी रुपये झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जाट’ व ‘गुड बॅड अग्ली’ या दोन्हीच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट झाली असली तरी वीकेंडला कलेक्शन वाढेल अशी शक्यता आहे. कारण अजित कुमार व सनी देओल या दोघांच्याही चित्रपटाला प्रेक्षकांचे व समीक्षकांचे चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत.