Janhvi Kapoor Talks About Plastic Surgery : जान्हवी कपूर आणि करण जोहर यांनी अलीकडेच ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोच्या भागात हजेरी लावली. मुलाखतीदरम्यान, अभिनेत्री जान्हवी सौंदर्य आणि प्लास्टिक सर्जरीच्या मुद्द्यावर मोकळेपणाने बोलली आहे.

जान्हवी कपूरने तिचे मत स्पष्टपणे मांडले. ती म्हणाली, “मला गेटकीपिंगवर (एखाद्या ट्रेंडला कोणी फॉलो करावं हे ठरवणं) विश्वास नाही. सोशल मीडियावर जेव्हा प्रत्येकाकडे एका विशिष्ट पद्धतीनं पाहिलं जात होतं, त्यांच्या दिसण्यावरून मतं बनवली जात होती, तेव्हा हे सर्व होताना पाहणाऱ्या तरुणींपैकी मी खूप प्रभावी होती. मला तरुण मुलींसमोर परिपूर्णतेची ही अशी कल्पना ठेवायची नाहीये. तुम्हाला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो, त्या गोष्टी तुम्ही करा. त्यावर माझा खूप विश्वास आहे. मला पूर्णपणे खुल्या पुस्तकासारखं वागायला आवडेल.”

आई श्रीदेवी यांच्याबद्दल जान्हवी काय म्हणाली?

जान्हवी कपूर पुढे म्हणाली, “मला वाटते की, मी माझ्या सर्व कामांमध्ये खूप समजूतदार, रूढीवादी आणि योग्य राहिले आहे. अर्थात, मला माझ्या आईचं मार्गदर्शन मिळालं होतं आणि मी ते शेअर करू इच्छिते. एक सावधगिरी म्हणून सांगू इच्छिते. कारण- तरुण मुली अशा प्रकारचे व्हिडीओ बघत आणि मलासुद्धा बफेलो-प्लास्टी करायची आहे, असं ठरवतात आणि जर त्यात काही चुकीचं झालं, तर ती सर्वांत वाईट गोष्ट ठरू शकते. त्यामुळे पारदर्शकता महत्त्वाची आहे”, असा सल्ला जान्हवीने दिला.

जान्हवी कपूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर, ती सध्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसली आहे. यापूर्वी ती ‘परम सुंदरी’ या चित्रपटात दिसली होती. जान्हवी पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘पेड्डी’ या दक्षिण भारतीय चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात ती राम चरणबरोबर दिसणार आहे.

जान्हवी कपूरने आपल्या दमदार स्टाईल आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या जान्हवी कपूरने अवघ्या काही चित्रपटांमध्ये काम करीत याशाचे शिखर गाठले आहे. ‘धडक’ चित्रपटानंतर जान्हवी कपूरने ‘गुंजन सक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जैरी’, ‘मिली’ व ‘बवाल’ या चित्रपटांमध्ये काम केले.