Kajol Talks About Salman Khan Stardom : बॉलीवूड अभिनेत्री काजोल ही इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले आहे आणि तिच्या अभिनयाने प्रभावित केले आहे. आता ही अभिनेत्री पौराणिक हॉरर चित्रपट ‘माँ’मध्ये दिसणार आहे.

काजोल सध्या तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे, ज्याचा ट्रेलर खूप आवडला होता.

चित्रपटाचे प्रमोशन करताना अभिनेत्रीने सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानबद्दल सांगितले. अभिनेत्रीने या तिन्ही कलाकारांबरोबर काम केले आहे. अभिनेत्री म्हणाली की, सलमान खानची स्टार पॉवर इतर कोणत्याही अभिनेत्याशी जुळत नाही.

गलाटा इंडियाला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत काजोलने शाहरुख खान आणि आमिर खानचे वर्णन प्रोफेशनल आणि उत्साही अभिनेते असे केले. अभिनेत्री म्हणाली की, हे अभिनेते त्यांच्या कामासाठी समर्पित आहेत आणि ते गांभीर्याने घेतात, पण सलमान खानचे स्टारडम वेगळे आहे. काजोल म्हणते, “सलमान हा सलमान खान आहे. तुम्ही यावर वाद घालू शकत नाही. तो इतक्या वर्षांपासून तसाच आहे आणि हे स्वतःच विश्वास ठेवण्यापलीकडे आहे. आमिरनेही एकदा म्हटले होते की, ‘सलमान खरोखर माझ्यापेक्षा मोठा स्टार आहे, त्याचा चित्रपट कसाही असला तरी तो १०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडतो आणि त्याचे चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात.'”

“सलमानच्या स्टारडमला कोणीही हात लावू शकत नाही” : काजोल

जेव्हा काजोलला सांगण्यात आले की अक्षय कुमारच्या १८ चित्रपटांनी १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे, जो सलमानच्या चित्रपटाइतकाच आहे. तेव्हा काजोल म्हणाली, “वाह, हे आश्चर्यकारक आहे, पण जेव्हा आपण स्टार पॉवरबद्दल बोलतो, तेव्हा कोणीही सलमानला हात लावू शकत नाही; तेव्हा अक्षयदेखील याच्याशी सहमत होईल.”

काजोल आणि सलमान खान यांनी ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘कुछ कुछ होता है’मध्ये एकत्र काम केले होते. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अद्भुत होती. काजोल सलमानबरोबर बिग बॉसच्या स्टेजवर दिसली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.