बॉलीवूड अभिनेत्री काजोल आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोलने तिच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तिने शाहरुख खानपासून आमिर खान आणि सलमान खानपर्यंतच्या स्टार्सबरोबर स्क्रीन शेअर केली आहे आणि हिट चित्रपट दिले आहेत.

पण, तुम्हाला माहीत आहे का की, काजोलच्या वडिलांनी एकदा सलमान खानकडे एक खास मागणी केली होती? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काजोलच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी ही मागणी केली होती.

काजोल व ट्विंकल खन्ना या दोघी सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या नवीन शोमुळे चर्चेत आहेत. खरं तर काही दिवसांपूर्वी काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या लोकप्रिय शो ‘टू मच’मध्ये अभिनेत्रीने स्वतः तिचे वडील शोमू मुखर्जी यांच्याबद्दल ही गोष्ट सांगितली होती. शोदरम्यान, सलमान खानने काजोलचे वडील शोमू यांच्याबरोबर घालवलेल्या वेळेची आठवण करून दिली.

सलमान म्हणाला, “काजोलचे वडील आणि मी खूप जवळचे होतो. ते आठवड्यातून दोनदा घरी यायचे. ते त्यांच्या मृत्यूच्या फक्त दोन दिवस आधी आले होते आणि नेहमीप्रमाणे ते लुंगी घालून आले होते. ते खूप आजारी होते.”

सलमान पुढे म्हणाला, “शोमूदा म्हणाले, ‘कृपया मला एक ड्रिंक दे मित्रा.’ मी त्यांना सांगितले, ‘शोमूदा नाही.’ पण, त्यांनी आग्रह धरला आणि म्हणाले, ‘मी काही दिवसांत जात आहे. कृपया मला एक ड्रिंक दे.’ मला काय करावे हे कळत नव्हते.”

सलमान म्हणाला, “त्यांनी मला त्यांना एक ड्रिंक देण्यास सांगितले. मी त्यांना एक ड्रिंक बनवून दिली आणि दोन दिवसांनी ते मरण पावले.” सलमानने ही कहाणी सांगितल्यावर काजोल भावूक झाली. काजोलने सलमान खानबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सर्वांना त्यांची ऑन-स्क्रीन जोडी खूप आवडली आहे.

सलमान खान आपल्या अभिनयानं अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. निरागस आणि शांत भूमिकांबरोबरच त्यानं आपल्या काही अॅक्शन भूमिकांमधूनही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वयाच्या साठीत पोहोचलेला सलमान अजूनही त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत येत असतो.