अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयापेक्षा जास्त बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असते. पण सध्या तिचं चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. कंगनाचे काही सुंदर फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कंगना बुडापेस्टमधल्या रस्त्यांवर वेगवेगळे पोज देताना दिसून आली.
अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी बुडापेस्टमध्ये पोहोचली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. कंगनाच्या पासपोर्ट प्रकरणामुळे बुडापेस्टमध्ये या चित्रपटाची शूटिंग उशिराने सुरू झाली. येत्या ऑगस्टपर्यंत ‘धाकड’च्या शूटिंगचं काम सुरू राहिल असं सांगण्यात येतंय.
‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगमधून मिळालेल्या मोकळ्या वेळेत कंगना बुडापेस्टमध्ये एन्जॉय करताना दिसून आली. याचे काही फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यात तिने प्लोरल ड्रेस परिधान केलेला आहे. बुडापेस्टच्या रस्त्यावर जणू ती एखाद्या ‘प्लोरल क्वीन’ सारखी दिसत आहे. बुडापेस्टमधल्या नैसर्गिक वातावरणाला साजेसा अशा ‘फ्लोरल ड्रेस’मध्ये ती आणखीनच खुलून दिसत आहे. कंगनाची ही ‘फ्लोरल ब्यूटी’ पाहून तिचे फॅन्स सुद्धा घायाळ झाले आहेत.
हे फोटोज शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “आज बॉली बिम्बो खेळायचं ठरवलं…आणि माझ्या बुद्धिमान इन्स्टा परिवारसाठी स्पेशल इन्स्टा स्टाईलचं फोटोशूट केलं आहे…”
View this post on Instagram
आणखी एका दुसऱ्या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, “हे फुल खरेदी केले आहेत माझ्या इन्स्टा गेमसाठी…माझ्या स्वाभिमानवर घातक आघात झाल्यानंतरही माझा घमंड चमकतोय…”
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तिसरी पोस्ट शेअर करताना तिनं लिहिलं, “खरं तर इथे येऊन खूप चांगलं वाटतंय…” या पोस्टसोबत तिने रस्त्यावर चालतानाचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तिनं हातात फुलांचा गुच्छा पकडलेला दिसून येत आहे. फोटोंमध्ये तिच्या मागे दिसत असेलेल्या इमारतींमुळे बुडापेस्ट शहरातील सौंदर्याची झलक देखील दिसून येत आहे.
View this post on Instagram
कंगनाचा आगामी ‘धाकड’ हा एक स्पाय थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटात ती ‘अग्नि’ची भूमिका साकारणार आहे. तर अर्जून रामपाल एका खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. नुकतील रिलीज झालेल्या ‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये झळकलेला ‘जेके’ म्हणजेच शारिब हाशमी सुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धाकड’ चित्रपटाच्या व्यतिरिक्त कंगनाचे ‘तेजस’, ‘थलायवी’ आणि ‘इंदिरा’ हे चित्रपट देखील रिलीज होणार आहेत.