BB OTT : शमिताच्या हॉटनेसवर करणने विचारला प्रश्न, राकेश म्हणाला…

संडे का वार या एपिसोडमध्ये करणने राकेशला हा प्रश्न विचारला होता. करण बिग बॉस ओटीटीचे सूत्रसंचालन करत आहे.

karan johar, shamita shetty, raqesh bapat,
'बिग बॉस ओटीटी'वर करणने राकेशला हा प्रश्न विचारला होता.

‘बिग बॉस ओटीटी’ या शोचा काल संडे का वार एपिसोड प्रदर्शित झाला. नेहमीप्रमाणे करण जौहर स्पर्धकांना भेटला. हा संडे का वार एपिसोड राकेश बापट आणि शमिता शेट्टीसाठी खास होता. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात शमिता राकेशला क्यूट बोलली होती त्यावरून करण त्या दोघांना सतत चिडवत होता. एवढंच नाही तर शमिताने राकेशला इथे येऊन किस कर सांगण्यावरून तिला करण चिडवत होता.

शोमध्ये शमिताने राकेशला ‘शरारा शरारा’ या तिच्या गाण्याची हूक स्टेप शिकवली आणि राकेशची स्तुती केली. यावेळी करणने राकेशला शमिताविषयी काही गोष्टी सांगायला सांगितल्या. ‘मला वाटतं की ती खूप सुंदर, खूप हॉट, खूप काळजी घेणारी आणि खूप चांगली व्यक्ती आहे. तिच्यात सगळ्या गोष्टी आहेत,’ असे राकेश म्हणाला. पुढे करणने त्याला शमिताच्या ‘हॉटनेस’वर कमेंट करायला सांगितले तर राकेश म्हणाला, ‘सर, शमिता खूप हॉट आहे.’ यावर शमिता लाजली आणि म्हणाली करण हे किती विचित्र आहे.

आणखी वाचा : ‘कोरिओग्राफरने २० मॉडेल समोर मला…’, मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी क्रितीने केला खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

आणखी वाचा : व्हर्जिनिटी ते कार सेक्स; ‘या’ सेलिब्रिटींनी त्यांच्या सेक्स लाईफवर केले होते उघडपणे वक्तव्य

‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सुरु झाल्यापासून शमिता आणि राकेश चर्चेत आहेत. दोघे सतत एकमेकांसोबत दिसतात. या आधी ते दोघे रोमॅन्टिक डेट वर गेले होते. एवढंच नाही तर राकेशने शमिताला फूट मसाज दिली आणि तिच्या गालावर टॅट्टू पण काढला. हे सगळं त्या दोघांनी एका टास्क दरम्यान केलं. प्रेक्षकांना राकेश आणि शमिताची केमिस्ट्री प्रचंड आवडली आहे. मात्र, काही नेटकरी ते दोघे हे फक्त शोसाठी करत असल्याचे म्हणत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karan johar asked raqesh bapat question about shamita shetty hotness raqesh says she is hot dcp

ताज्या बातम्या