चाहतीचा चुकून धक्का लागताच संतापली करीना, बेबोचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल

करीनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

kareena kapoor, old video went viral,
करीनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच करीनाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करीना आणि तिचा राग या विषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. असचं काही तरी करीनाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा म्हणजेच २०२० मधला आहे. व्हिडिओमध्ये करिना तैमूरसोबत गेटमधून बाहेर निघते. बाहेर पडण्या आधीपासूनच एक चाहती करीनासोबत एक फोटो काढण्याचा आग्रह धरते. त्यानंतर गेटमधून बाहेर पडल्यावर करीना बाहेर थांबते आणि मागून येणारी ती चाहती पटकन येत होती आणि तिचं लक्ष नसल्याने तिचा धक्का हा करीनाला लागतो. त्यानंतर करीनाला प्रचंड राग येतो. ती थोडावेळ थांबते नंतर त्या चाहतीकडे रागात बघते आणि तिला धक्का का दिलासं हे विचारते. एवढं झालेल्यानंतर रागाने लाल झालेली करीना त्याचाहतीसोबत न हसता फोटो काढते आणि निघून जाते. यावेळी करीनाचा राग हा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : फोटो बच्चन कुटुंबाचा पण चर्चा मात्र भिंतीवरच्या पेंटिंगची, किंमत ऐकलीत का?

आणखी वाचा : “पैसे टाकले म्हणून तिने राज कुंद्राशी लग्न केलं!”; अनिल कपूरच्या विधानावर शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर, म्हणाली…

करीनाचा हा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्या चाहतीला देखील ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘करीना जया बच्चनसारखीच रागीच आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही चित्रपटात खूप चांगली भूमिका सारकते. तिथे ही हसत असते आणि खऱ्या आयुष्यात रागात.’ तिसरा नेटकरी करीनाच्या त्या चाहतीला म्हणाला, ‘या लोकांपासून लांब रहा.’

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडच चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या व्यतिरिक्त करीना ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत रणवीर सिंह, विकी कौशल, आलिया भट्ट, भूमि पेडनेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर दिसणार आहेत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kareena kapoor old video went viral where she got angry and scold her fan dcp

ताज्या बातम्या