Sunjay Kapur Last Video: करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूर याचे १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. संजय कपूरच्या निधनानंतर व्यवसाय विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
पोलो खेळताना मधमाशी गिळल्यामुळे ५३ वर्षीय संजय याचे निधन झाले. मधमाशी गिळल्यामुळे संजयला श्वास घेताना त्रास झाला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.
संजय कपूरच्या मृत्यूनंतर सात दिवसांनी दिल्लीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्वांमध्ये संजय कपूरचा शेवटचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संजय कपूरचा शेवटचा व्हिडीओ
करिश्मा कपूरचा एक्स पती व उद्योगपती संजय कपूर याच्या दुःखद निधनानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये संजय हृदयविकाराच्या झटक्याने जमिनीवर पडलेला दिसतो. त्यादरम्यान त्याला वैद्यकीय मदत दिली जात आहे.
हा व्हिडीओ भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू व संजय कपूरचा मित्र अजित नंदलने १४ जून रोजी एक्सवर शेअर केला. दोघेही एकत्र पोलो खेळायचे. अजित व्हिडीओ शेअर करीत म्हणाला, “संजय कपूरचा शेवटचा रेस्क्यू व्हिडीओ. सज्जन जैसल आणि संजयची टीम यांच्यामध्ये एक सामना होता. सज्जनही तिथे होता”.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ यूकेमधील आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेली दिसत आहे. या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही; पण अजित यांच्या म्हणण्यानुसार, “व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती संजय कपूर आहे. संजय कपूरला CPR देण्यात येत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, हे मैदान संजयच्या शेवटच्या फोटोमध्ये दिसत होतं, तसंच काहीसं दिसत आहे”.
Last rescue video of Sanjay Kapoor ?match between Sajjan jaisal and Sanjay team,sujjan also there ?
— Ajit Nandal ?Indian Cowboy (@AjitNandal) June 14, 2025
Very sad time for all horse lovers, Rest in peace my friend ? #sanjaykapoor #polo pic.twitter.com/vWHWFFoqqg
दिवंगत संजय कपूरचे तीन लग्ने झाली होती. त्याची पहिली पत्नी नंदिता महतानी होती. दोघांनी लग्नानंतर चार वर्षांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर संजय कपूरने २००३ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केले. त्यांना मुलगी समायरा आणि मुलगा कियान, अशी दोन मुले आहेत. २०१४ मध्ये दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला गेला होता; परंतु नंतर त्यांनी एकमेकांवर अनेक आरोप केले होते. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केले. प्रियाला तिच्या पहिल्या लग्नापासून सफिरा ही मुलगी आहे आणि संजयपासून एक मुलगा आहे, ज्याचे नाव अजारिया आहे.