छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता साहिल आनंद सध्या बराच चर्चेत आहे. साहिल आनंद सोशल मीडियावर तसा चांगलाच सक्रिय आहे. मात्र काही दिवसांपूर्वी साहिल आनंदने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. १९ जुलै रोजी साहिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तो मानसिक आरोग्याबद्दल बोलत होता. याच कारणामुळे तो काही काळ सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याचे त्याने या पोस्टद्वारे सांगितले. या निर्णयामुळे त्याच्या बऱ्याच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
साहिलने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र आता साहिलने ही पोस्ट काढून टाकली आहे आणि त्या जागी माफी मागतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओत पोस्ट करत त्याने लिहीले की “मी तुम्हाला असं मधेच सोडल्या बद्दल तुमची (चाहत्यांची) माफी मागतो.” असं त्याने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले. साहिलने हा व्हिडीओ त्याच्या गाडीत बसून शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांशी बोलताना तो म्हणाला की “सॉरी मी तुम्हाला त्रास दिला, मला वाटले नव्हते की माझा तो मेसेज इतका परिणामकारक ठरेल.”

यापुढे बोलताना साहिल म्हणाला की “माझ्या त्या पोस्टमुळे कुणी दुखावलं असेल तर असेल मला माफ करा, मला तुम्हाला दुखवायचे नव्हते. मला फक्त सोशल मीडिया सगळ्यापासुन लांब राहायचे आहे. हे स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे कारण तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग आहात.” साहिलने त्या व्हिडीओत सपष्ट केलं की तो एक चित्रपटसाठी काम करत आहे. गंभीर विषयावर असून अजुनही यातल्या पात्रामधून बाहेर पडू शकला नाही. याचा गोष्टीचा त्याला त्रास होत असल्याने तो चंदीगडला गेलो. यातून बाहेर पडण्यासाठी तो मानसपचोरतज्ञांना भेटला आहे. काही काळ स्वत:ला वेळ देण्याचा सल्ला मानसपचोरतज्ञांनी दिला असल्याचे त्याने या व्हिडीओत सांगितले
View this post on Instagram
साहिल आनंदने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात काम केले आहे. ‘है अपना दिल तो आवारा’, ‘बिग बॉस’ आणि ‘कसोटी जिंदगी की’ सारख्या अनेक मालिकांमध्ये देखील त्याने काम केले आहे.