काश्मीर हे राज्य भारताचा मुकुट म्हणून ओळखलं जात. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या राज्यात अनेक पर्यटक जात असतात. काश्मीर राज्याची भुरळ बॉलीवूडला देखील पडली आहे. सत्तरच्या दशकापासून या भागात चित्रीकरण होताना दिसून आले आहे, नुकताच अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या ‘ग्राउंड झिरो’ या आगामी चित्रपटाच चित्रीकरण पहलगाम येथे करत आहे. या चित्रपटाच्या टीमवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. असाच एक प्रकार ‘काश्मीर फाईल्सचे’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्याबाबतीत घडला होता.

‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात त्यांची पत्नी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनीदेखील काम केलं आहे. न्युज १८ला दिलेल्या मुलाखतीत त्या असं म्हणाल्या होत्या की, ‘चित्रपटाचे चित्रीकरण हा त्यातील सर्वात छोटा भाग होता. संपूर्ण संशोधन, लोकांपर्यंत पोहोचणे, चित्रपटासाठी पैसे मिळवणे, कलाकारांना सहभागी करून घेणे, या गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या’.

“मी यंदाची दिवाळी मन्नतवर… ” शाहरुखची पत्नी गौरी खानने केला खुलासा

पल्लवी जोशी विवेक अग्निहोत्री यांच्याविरोधात काश्मीरमध्ये फतवा निघाला होता, फतव्यावरून त्या पुढे म्हणाल्या की ‘आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण १ महिन्यात संपवले. आम्ही शेवटचा सीन चित्रित करत होतो तेव्हा आमच्या विरोधात फतवा निघाला होता. मी विवेकला म्हणाले आपण लवकर हा सीन चित्रित करूयात आणि थेट विमानतळ गाठूया, आम्हाला ही संधी पुन्हा मिळणार नव्हती त्यामुळे आम्ही तो सीन पूर्ण केला आणि निघालो. आम्ही बाकी कलाकारांना त्यांचे सामान घेण्यासाठी हॉटेलवर पाठवले होते’.

‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली.‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट लोकांना आवडला, तर काहींना त्यावर टीकाही केली.