अभिनेत्री आलिया भट्टने आपण गरोदर असल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. ही बातमी ऐकून सगळ्यांनाच सुखद धक्का बसला. १४ एप्रिलला आलिया-रणबीर कपूरचं लग्न झालं. लगेचच आलियाने गरोदर असल्याचे सांगताच अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं. आलियानंतर बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. लवकरच आपण गरोदर असल्याचं कतरिना सांगणार असल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा – कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न, घटस्फोट, नैराश्य अन्…; नात्याच्या दि एण्डनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

विका कौशल आणि कतरिना यांचा विवाहसोहळा ९ डिसेंबर २०२१मध्ये थाटामाटात पार पडला. लग्नाच्या दोन ते तीन महिन्यांनंतर कतरिना गरोदर असल्याचं सतत बोललं जात होतं. सोशल मीडियावर कतरिना सतत सक्रिय असते. पण गेल्या महिन्याभरापासून ती इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्वतःचे किंवा विकीबरोबरचे फोटो शेअर करताना दिसत नाही. तसेच कतरिनाने लाइमलाइटपासूनही दूर राहणंच पसंत केलं आहे.

मध्यंतरी तिचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण यावेळी तिने लूज फिटींग असलेला ड्रेस परिधान केला होता. आता १६ जुलैला कतरिनाचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ती आपण गरोदर असल्याचं जगजाहिर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.

आणखी वाचा – अथिया- केएल राहुलचं ठरलं! कधी आणि कुठे पार पडणार सुनील शेट्टीच्या लेकीचा शाही विवाहसोहळा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर देखील कतरिनाच्या प्रेग्नेंसीची बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. २०१९मध्ये विकी-कतरिनाने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २ वर्षांमध्येच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता कतरिना खरंच गरोदर आहे की नाही? हे तिच्या वाढदिवसादिवशीच कळू शकेल.