‘कौन बनेगा करोडपती १३’च्या शानदार शुक्रवारच्या भागात दीपिका पदूकोण आणि फराह खानने खास हजेरी लावली होती. या खास भागात बिग बी अमिताभ बच्चन यांनी दीपिका आणि फराहसोबत धमाल गप्पा मारल्या. या खास भागात बॉलिवूड आणि शूटिंगमधील अनेक किस्से देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळाले. यावळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी दीपिका आणि रणवीरच्या रोमांसमुळे ते कसे पेचात सापडले होते याचा धमाल किस्सा देखील शेअर केला.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या या खास भागात रणवीर आणि दीपिकाचा तो जुना किस्सा शेअर केल्याने फराहसह सगळ्यांना हसू फुटलं. अमिताभ म्हणाले, ” माझ्यासोबतही दुर्घटना घडलीय. आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अवॉर्ड सेरेमनी असते. सगळे जातात तर मी देखील गेलो होतो. रणवीर सिंह देखील आला होता. यावेळी रणवीर एका क्रेनमधून खाली आला. तो जवळपास माझ्या खूप जवळ आला होता. त्याने डोळ्यांकडे दोन बोटं दाखवत इशारा केला. मला त्याचा काहीच अर्थ कळाला नाही त्यामुळे मी देखील तसाच इशारा केला. त्याने पुन्हा तसाच इशारा केल्यानंतर पुन्हा मी देखील तेच केलं. काही वेळ हे असचं सुरु होतं. अखेर माझ्या शेजारी बसलेल्या जया बच्चन हळूच कानात कुजबुजल्या की हा इशारा तुमच्यासाठी नाही. शेजारी पहा कोण बसलंय? यावेळी शेजारी पाहतो तर दीपिका बसली होती.” असं सांगत बिग बींनी रणवीर दीपिकाच्या लग्नाच्या आधीचा हा मजेशीर किस्सा शेअर केला.

हे देखील वाचा: “राज कुंद्रा कुठे गेला फिल्म बनवायला ?”; गणेशोत्सव साजरा करतानाचे फोटो शेअर केल्याने शिल्पा ट्रोल

हे देखील वाचा: “हेल्मेट घालूनच पहिल्यांदा विकत घेतलं कंडोम”; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी दीपिकासह फराह खान आणि ऑडियन्सदेखील जोरजोरात हसत होते. या खास भागात बिग बींनी दीपिका सेटवर दर तीन मिनिटांनी खात असल्याचा धमाल किस्सा देखील शेअर केला. दीपिका आणि बिग बींनी पीकू सिनेमात एकत्र काम केलं होतं. यावेळी “सेटवर दीपिका दर तीन मिनिटांनी डब्बा उघडून काहीना काही खायची पण एकदाही तिने मला विचारलं नाही” असं बिग बी म्हणाले.