Video : केबीसीच्या शूटसाठी तब्बल ४ तास उशिरा पोहोचला कपिल शर्मा, बिग बींनी सुनावले खडे बोल

यावर अमिताभ बच्चन हे कपिलला उशिरा येण्यावरुन चांगलंच सुनावलं.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. या शोमध्ये ‘शानदार शुक्रवार’ असा एक एपिसोड चित्रीत केला जातो. या एपिसोडमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. येत्या शानदार शुक्रवारच्या खास भागात अभिनेता कपिल शर्मा आणि सोनू सूद हे हजेरी लावणार आहेत. नुकतंच या भागाचे दोन प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहेत. यावर अमिताभ बच्चन हे कपिलला उशिरा येण्यावरुन चांगलंच सुनावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सोनी टीव्हीने प्रदर्शित केलेल्या या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन, कपिल शर्मा आणि सोनू सूद पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत अमिताभ कपिलला त्याच्या उशिरा येण्याच्या सवयीवरुन चांगलंच सुनावताना दिसत आहेत. यावेळी अमिताभ बच्चन म्हणतात, “तू आज अगदी वेळेत आला आहेस. तू मला १२ वाजता भेटणार होता आणि आता तू बरोबर ४.३० वाजता आला आहेस,” असा टोमणा मारत बिग बींनी कपिलला सुनावलं.

सध्या या संपूर्ण शोच्या भागाचा दोन प्रोमो समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओत कपिल हा अमिताभ यांची मस्करी करताना दिसत आहे. यावेळी कपिलने त्याच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा बिग बींना सांगितला. “मी अमिताभ बच्चन बोलतोय, असे जेव्हा मी कधी समोरच्या व्यक्तीला सांगतो, तेव्हा तो घाबरतो. एकदा मी तुमची कॉपी केली आणि म्हणालो, हॅलो, मी कपिल शर्मा बोलत आहे. यावर समोरुन उत्तर आले, यार तू खूप बोलतोस, कमी बोल रे,” असे त्याने म्हटले.

KBC 13 : ‘शोले’चा ‘तो’ सीन शूट करण्यासाठी लागले होते तब्बल ३ वर्षे, अमिताभ यांनी केला खुलासा

तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये कपिल शर्मा हा अमिताभ बच्चन यांनी नक्कल करताना दिसत आहे. यावेळी कपिल शर्मा म्हणतो की, बच्चन सर हे त्यांच्या घरी येणाऱ्या सर्व पाहुण्यांनाही चार ऑप्शन देतात. नमस्कार तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, छास की लिंबूपाणी? यावर सोनू सूद आणि बिग बी जोरजोरात हसू लागतात. दरम्यान या संपूर्ण एपिसोड येत्या शुक्रवारी प्रदर्शित केला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kbc 13 kapil sharma arrives 4 hours late for shoot amitabh bachchan got angry nrp