‘कौन बनेगा करोडपती १४’ चा नवा एपिसोड धमाकेदार आहे. या एपिसोडमध्ये २७ वर्षीय स्पर्धक आयुष गर्ग सहभागी झाला होता. मूळचा दिल्लीचा असलेला आयुष हा स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन मॅनेजर आहे आणि त्याने आपल्या उत्तरांनी होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासह प्रेक्षकांचीही मनं जिंकली. नुकताच या एपिसोडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे आयुष शोमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन आला होता.

आयुषच्या या धाडसाचं बिग बींनी कौतुक केलं आहे. तसेच बिग बींनी त्यांच्या शालेय जीवनातील एक किस्साही सांगितला. त्यांच्यात आणि आयुषमध्ये अनेक साम्य असल्याचंही ते यावेळी म्हणाले. केबीसी खेळत असताना, आयुष गर्गनं सांगितलं की, त्याला खेळाची आवड आहे. तो फुटबॉल खेळतो मात्र त्याला क्रिकेटही बघायला आवडतं. आयुषच्या या बोलण्यावर बिग भी म्हणाले की, त्यांच्या आणि आयुष आयुष्यात अनेक साम्य आहेत आणि त्यांनाही हे दोन्ही खेळ खूप आवडतात.
आणखी वाचा- “पनीरवर GST दिल्यानंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी पैसा…” अनुराग कश्यपचं विधान चर्चेत

या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या शालेय जीवनातील एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं, जेव्हा शाळेतील त्यांच्या एका शिक्षकांनी त्यांना फुटबॉलमध्ये गोलकीपर बनवलं होतं. पण त्यांनी आपल्या पहिल्याच गेममध्ये ८ गोल सोडले आणि त्यानंतर त्यांना अर्धवट खेळातूनच बाहेर करण्यात आलं होतं. अमिताभ यांचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच हसू येतं.

शोच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांनी आयुषची गर्गशी ओळख करून दिली तेव्हा त्यांनी त्याला विचारले की त्याच्यासोबत कोण आले आहे? ज्यावर आयुष हसतो आणि “माझी गर्लफ्रेंड आरुषी शर्मा.” असं उत्तर देतो. त्यानंतर कॅमेरा तिच्याकडे जातो ती हसून सर्वांना नमस्कार करताना दिसते. आयुषच्या या धाडसी निर्णयाबद्दल बिग बींनीही त्याचं कौतुक केलं.

आणखी वाचा- KBC 14: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नासाठी आमिरने वापरली लाइफ लाइन, तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर?

अमिताभ बच्चन म्हणाले, “मी हे पहिल्यांदाच ऐकतोय आणि मला खूप अभिमान वाटतोय की तू तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्यासोबत आणलंस. व्वा!” बिग बींनी आयुषला, दोघांची भेट कशी झाली? असा आणखी एक प्रश्नही केला. यावर उत्तर देताना आयुष म्हणाला, “काही वर्षांपूर्वी ऑनलाइन डेटिंगवर मी आरुषीला भेटलो होतो.” यावर अमिताभ बच्चन यांनी त्याचं कौतुक करत हसून दाद दिली.